गोतावळ्याच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क

By Admin | Updated: February 13, 2017 01:30 IST2017-02-13T01:30:50+5:302017-02-13T01:30:50+5:30

महानगरपालिकेच्या अवाढव्य मतदारसंघांमुळे उमेदवारांची चांगलीच दमछाक होत असून, ‘मिनी आमदार’ होण्याच्या प्रयत्नांत असलेल्या उमेदवारांनी

Contact with voters through mobiles | गोतावळ्याच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क

गोतावळ्याच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क

पुणे : महानगरपालिकेच्या अवाढव्य मतदारसंघांमुळे उमेदवारांची चांगलीच दमछाक होत असून, ‘मिनी आमदार’ होण्याच्या प्रयत्नांत असलेल्या उमेदवारांनी आपले आप्त, मित्र, सगेसोयरे अशा गोतावळ्याला प्रचारकार्यात सामावून घेतले आहे. उमेदवारांऐवजी त्यांचे प्रतिनिधी म्हणून जात हे आप्त आपली भूमिका मतदारांना पटवून देत आहेत.
शहरासह उपनगरांमध्ये उंच इमारतींची संख्या मोठी आहे. त्यातच वॉर्ड पद्धतीऐवजी प्रभाग पद्धतीने निवडणूक होत असल्याने उमेदवारांना घरोघर पोहोचणे जिकीरीचे झाले आहे. उमेदवारी निश्चिती होण्यापूर्वी ज्यांना तिकिटाची खात्री होती, अशा काही उमेदवारांनी सोसायट्या, बंगले, रो हाऊस अशा भागांसह वाडे, चाळी, झोपडपट्ट्या अशा वस्त्यांमध्ये एक ते दोन वेळा धावत्या भेटी दिल्या. त्यामुळे आपल्या भागात कोण उमेदवार असू शकतील, याचा अंदाज मतदारांना बांधता आला. ज्या प्रभागांमध्ये अखेरच्या क्षणापर्यंत उमेदवारी निश्चिती झाली नाही, त्या ठिकाणी मतदारांमध्येही उमेदवारांविषयी संदिग्धता होती. उमेदवारी निश्चित होण्याच्या कालावधीपासून मतदानाच्या आदल्या दिवसापर्यंत १२ दिवस प्रत्यक्ष प्रचारासाठी हाती होते. प्रचारासाठी ७ दिवसांचा अवधी उरल्याने उमेदवारांची सकाळपासून रात्री उशिरापर्यंत धावपळ सुरू आहे. आजच्या रविवारी सर्वच मतदारसंघांमध्ये प्रचाराची धांदल दिसून येत होती.

Web Title: Contact with voters through mobiles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.