ग्राहक न्याय मंच नव्या वर्षात नव्या जागेत

By Admin | Updated: January 1, 2015 01:02 IST2015-01-01T01:02:19+5:302015-01-01T01:02:19+5:30

पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाला नवीन वर्षातील पदार्पणातच हक्काची जागा मिळाली आहे

Consumer Justice Forum In New Year New Year | ग्राहक न्याय मंच नव्या वर्षात नव्या जागेत

ग्राहक न्याय मंच नव्या वर्षात नव्या जागेत

हिनाकौसर खान-पिंजार ल्ल पुणे
पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाला नवीन वर्षातील पदार्पणातच हक्काची जागा मिळाली आहे. जिल्हा तक्रार निवारण मंच मंगळवारी (१ जानेवारीपासून) विधान भवनसमोरील नवीन प्रशासकीय इमारतीत स्थलांतरित होत आहे.
ग्राहकांना त्यांच्या पैशांचा योग्य मोबदला मिळालाच पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. यासाठीच शासनाने २४ डिसेंबर १९८६ रोजी ग्राहक कायदा केला. कायदा नागरिकांना संरक्षण देत असला, तरी फसवणूक थांबलेली नाही. यामुळेच ग्राहक तक्रार निवारण मंचाची ओघानेच गरज निर्माण झाली.
आपल्या फसवणुकीविरुद्ध, निकृष्ट दर्जाच्या, त्रुटीयुक्त सेवा ग्राहकांच्या माथी थोपविल्यानंतर त्याविरुद्ध दाद मागण्याची सोय या मंचामुळे निर्माण झाली. मात्र, या मंचाला हक्काची प्रशस्त अशी जागा नव्हती.
ग्राहक न्याय मंचाचे सुरुवातीला मार्केट यार्ड येथे कामकाज चालत होते. मात्र, तेथील जागा अपुरी पडल्याने २००१मध्ये हा न्याय मंच बिबवेवाडी येथील पुष्पा हाईट्स या इमारतीतील जागेत स्थलांतरित करण्यात आला. तेव्हापासून तेथेच मंचाचे कामकाज चालत होते.
ही जागाही अपुरी पडू लागली. शिवाय, शहराच्या एका टोकाला ही जागा असल्याने शहर व परिसरातून मंचाकडे येण्यास लोकांची गैरसोय व्हायची. त्यामुळेच जिल्हा तक्रार निवारण मंच आणि अतिरिक्त जिल्हा तक्रार निवारण मंच या दोन्हींसाठी शासनाकडे जागेची मागणी करण्यात आली. शासनाने सध्या नवीन प्रशासकीय इमारतीत ग्राहक मंचासाठी २४५५ चौरसफूट जागा देऊ केली आहे; मात्र ती दोन्ही मंचांसाठी पुरेशा ठरणाऱ्या नाहीत. त्यामुळे सध्या केवळ एकच मंच तेथे स्थलांतरित होईल. पुणे शहरातून तक्रारींचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे एकच मंच तेथे पूर्णपणे स्थापित होणार आहे व लवकरच अतिरिक्त जिल्हा मंचही स्थलांतर करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

बिबवेवाडी येथील जागा ही अपुरी पडत होती. शिवाय, पुणे शहरातील तक्रारींचे प्रमाण अधिक असल्याने रेकॉर्ड ठेवण्यासाठी ही जागा कमी पडत होती. त्यामुळे नवीन जागेतील प्रवेश गरजेच होते. फक्त दोन्ही मंचाचे कामकाज पाहणाऱ्या वकिलांची थोडी फरफट हाईल. एकाच छताखाली काम करणे त्यांना सोयीचे होते. तरीही हजारोंनी भाडे भरण्यापेक्षा आपल्या हक्काची जागा मिळणे कधीही श्रेयस्कर आहे.
- प्रणाली सावंत,
माजी अध्यक्षा, अतिरिक्त पुणे जिल्हा
तक्रार निवारण मंच

Web Title: Consumer Justice Forum In New Year New Year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.