सरंक्षण खात्याच्या वैद्यकीय विभागाला ग्राहक मंचाचा दणका

By Admin | Updated: August 20, 2014 23:37 IST2014-08-20T23:37:14+5:302014-08-20T23:37:14+5:30

प्रसूतीदरम्यान महिलेच्या शरीरामध्ये टाक्यांची सुई ठेवून वैद्यकीय सेवेत निष्काळजीपणा केल्याप्रकरणी केंद्रीय संरक्षण विभागाच्या सचिवांसह 7 जणांना ग्राहक मंचाने दंड ठोठावला आह़े

Consumer Forum's Criminal To Medical Department of Defense Department | सरंक्षण खात्याच्या वैद्यकीय विभागाला ग्राहक मंचाचा दणका

सरंक्षण खात्याच्या वैद्यकीय विभागाला ग्राहक मंचाचा दणका

पुणो : प्रसूतीदरम्यान महिलेच्या शरीरामध्ये टाक्यांची सुई ठेवून वैद्यकीय सेवेत निष्काळजीपणा केल्याप्रकरणी केंद्रीय संरक्षण विभागाच्या सचिवांसह 7 जणांना ग्राहक मंचाने दंड ठोठावला आह़े त्या सर्वाना एकत्रितपणो 7 लाख रुपयांची नुकसानभरपाई 9 टक्के व्याजदराने देण्याचे आदेश दिले आहेत़ ग्राहक तक्रार मंचाचे अध्यक्ष व्ही़ पी़ उत्पात, सदस्य मोहन पाटणकर, क्षितिजा कुलकर्णी यांनी हा निकाल दिला़
या प्रकरणी राजकुमार जैसवार व पत्नी पल्लवी जैसवार (रा़ कोंढवे धावडे) यांनी संरक्षण खाते सचिव (दिल्ली), महासंचालक वैद्यकीय सेवा (आर्मी, दिल्ली), कमांडिंग ऑफिसर वेस्टर्न कमांड मेडिकल ब्राँच, चंदीमंदिर, कमांडिंग ऑफिसर हेडक्वॉर्टर मेडिकल बँ्रच, पटियाला मिलिटरी हॉस्पिटलचे कमांडिंग ऑफिसर, पुणो येथील सदर्न कमांड मेडिकल बँ्रच कमांडिंग ऑफिसर, कमांडिंग कमांड हॉस्पिटल सदर्न कमांड, वानवडी व कमांडिंग ऑफिसर मिलिटरी हॉस्पिटल खडकवासला यांच्याविरुद्ध ग्राहक मंचाकडे धाव घेतली होती़ 
शस्त्रक्रियेद्वारे सुई काढून टाकण्यात आली़ दरम्यान, या काळात पल्लवी यांना नोकरी गमवावी लागली़ तक्रारदारांनी ग्राहक मंचात तक्रार दाखल करून 1क् लाख रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली़ अॅड़ राजन देशपांडे आणि अॅड़ सतीश कांबळे यांनी राजेशकुमार जैसवार हे लष्करात नोकरीला असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणारी सेवा ही ग्राहक ठरत असल्याचा युक्तिवाद केला़ तो मंचाने मान्य केला़ 
 
4राजेशकुमार जैसवार हे आर्मीमधून हवालदार पदावरून निवृत्त झाले असून त्यांची पत्नी खासगी नोकरदार आह़े 2क्क्2च्या सुमारास पल्लवी यांना प्रसूतीसाठी पटियाला येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होत़े त्या वेळी प्रसूतीदरम्यान टाके घालण्यासाठी वापरली जाणारी सुई त्यांच्या शरीरात तशीच राहिली होती़ 
4या काळात पल्लवी यांना पोटदुखी, कंबरदुखीचा त्रस होऊ लागला़ दरम्यान 2क्क्6मध्ये खडकवासला येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दुस:यांदा दाखल झाल्यावर त्यांची प्रसूती साधारण झाली; परंतु त्यानंतर त्यांचा पोटदुखीचा त्रस वाढल्याने त्यांनी खासगी रुग्णालयात जाऊन याबाबतची तपासणी केली़ त्यांना प्रसूतीच्या भागामध्ये सुई राहिल्याचे समजल़े 

 

Web Title: Consumer Forum's Criminal To Medical Department of Defense Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.