शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

चार महिन्यांनंतर दाखल करता येणार ग्राहक मंचाचे दावे; कोरोनाचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 18:44 IST

लॉकडाउन सुरू झाल्यापासून ग्राहक मंचाचे कामकाज देखील बंद

ठळक मुद्देलॉकडाउन सलग तीनदा वाढल्याने प्रलंबित दाव्यांना थेट सप्टेंबर महिन्यांमधील तारखा

पुणे ; कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला असून त्यामुळे ग्राहक, नागरिक, पक्षकार, कर्मचारी या सर्वांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. सतत वाढणारा कोरोना यामुळे न्यायालयीन कामकाजात बदल करण्यात आले आहेत. विशेषतः ग्राहक मंचात दाखल असलेल्या दाव्यांना तब्बल चार महिन्यानंतरच्या तारखा देण्यात आल्या आहेत.लॉकडाउन सुरू झाल्यापासून ग्राहक मंचाचे कामकाज देखील बंद आहे. त्यामुळे दाव्यांना पुढील तारीखा देण्यात आल्या होत्या. मात्र लॉकडाउन सलग तीनदा वाढल्याने प्रलंबित दाव्यांना थेट सप्टेंबर महिन्यांमधील तारखा देण्यात आल्या आहेत. ग्राहक संरक्षण अधिनियम 1980 मधील कलम 24 (ब) च्या अधिकारानुसार याबाबत परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यामुळे दावा दाखल केल्यापासून 90 दिवसांच्या आत ग्राहकांना न्याय द्यावा, हा ग्राहक मंचाचा नियम पाळणे शक्य होणार नाही.अशीच स्थिती राष्ट्रीय ग्राहक मंचाची असून तेथील प्रकरणांना दीड महिन्यानंतरच्या तारखा देण्यात आल्या आहेत. तात्काळ प्रकरण असल्यास न्यायालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 वाजताच ते सादर करावे, असे परिपत्रक राष्ट्रीय ग्राहक मंचाचे संयुक्त रजिस्टर एस. हनुमंता राव यांनी काढले आहे.दाव्याच्या निमित्ताने मंचात येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. संबंधित व्यक्ती कुठल्या भागातून आला हे शोधणे अवघड असते. त्यांच्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी लांबच्या तारखा देण्यात आल्या आहेत. तसेच दररोज सूनवणी होणाऱ्या दाव्यांची संख्यादेखील कमी करण्यात आली आहे. त्यामुळे आपोआप गर्दी कमी होईल व संसर्ग वाढणार नाही, अशी माहिती मंचाकडून देण्यात आली.

 ............................

तातडीच्या दाव्यावर मात्र सुनावणी होणार

जुन्या प्रकरणांना लवकर तारखा द्याव्या, अशी मागणी होत आहे. त्याचा देखील विचार केला जाणार आहे. गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी रोजच्या सूनवणींची संख्या कमी करून लांबच्या तारखा देण्यात आल्या आहेत. तातडीच्या दाव्यावर मात्र सुनावणी होणार आहे. - उमेश जावळीकर, अध्यक्ष, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच.

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालय