शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहक दिन ठरू नये सरकारी पातळीवरील औपचारिक बाब

By राजू इनामदार | Updated: December 11, 2024 18:22 IST

ग्राहक पंचायतीची अपेक्षा: मोबाइल कंपन्या, बांधकाम व्यावसायिक यांनाही बोलवावे  

पुणे - संपूर्ण भारतात साजरा करण्यात येणारा २४ डिसेंबर हा ग्राहक दिन जिल्ह्यात फक्त एक सरकारी उपचार म्हणून साजरा केला जातो. तसे न करता ज्यांच्याकडून ग्राहक सर्वाधिक त्रस्त करणाऱ्या मोबाइल कंपन्या, बांधकाम व्यावसायिक, ऑनलाइन सेवा देणाऱ्या कंपन्या यांनाही या दिनासाठी बोलवावे, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या पुणे शाखेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.याविषयीचे लेखी पत्रच पंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे. पंचायतीच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष विलास लेले, पुणे शहर अध्यक्ष विजय सागर यांनी सांगितले की, दरवर्षी प्रशासनाच्या वतीने या दिनासाठी फक्त काही सरकारी अधिकारी, ग्राहक संघटनांचे प्रतिनिधी यांनाच बोलावले जाते. ज्यांच्याकडून ग्राहकांना सर्वाधिक त्रास होतो, अशा कंपन्यांच्या प्रतिनिधींनाही या दिवशी बोलावले पाहिजे. त्यातून या कंपन्या व ग्राहक यांच्यात विश्वासाचे नाते तयार होईल व त्रासाचे प्रकार कमी होतील. त्यामुळेच यंदाच्या २४ डिसेंबरच्या आधीच आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना याविषयी लेखी कळवले असल्याची माहिती लेले यांनी दिली.मोबाइल कंपन्यांचे प्रतिनीधी, ब्रॉड बँड व वाय-फाय सेवा देणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी, डीटीएच सेवा देणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनीधी, ऑनलाइन सेवा देणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी, टीव्ही चॅनलचे प्रतिनिधी, बँका आणि फायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधी, इन्शुरन्स कंपन्यांचे प्रतिनिधी, व्यापारी व उद्योजकांचे प्रतिनिधी, मेडिकल असोसिएशन व केमिस्ट असोसिएशनचे प्रतिनिधी, बांधकाम व्यवसाय असोसिएशनचे अशी यादीच लेले यांनी पत्रात दिली आहे.पंचायतीच्या पुणे विभागाचे पदाधिकारी रवींद्र वाटवे, प्रकाश राजगुरू, सुनील नाईक, अंजली देशमुख, विणा दीक्षित, राजश्री दीक्षित, विजया वाघ, अंजली करंबळेकर, अंजली फडणीस, माधुरी गाणू यांच्या पत्रावर स्वाक्षऱ्या आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांबरोबर यासंदर्भात चर्चाही झाली आहे. त्यांनी पंचायतीच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आम्ही दिलेली यादी त्यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिली असून, या सर्व कंपन्यांच्या प्रतिनिधींना २४ डिसेंबरला ग्राहक दिनाच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. - विलास लेले, अध्यक्ष, अ. भा. ग्राहक पंचायत

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडpanchayat samitiपंचायत समितीbusinessव्यवसायconsumerग्राहकConsumer Goodsग्राहकोपयोगी वस्तू