शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

गवंडीकाम करणाऱ्या गिरीशची भारत श्री किताबाला गवसणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 17:04 IST

जर मनात जिद्द असेल तर नशीबही आडवे येऊ शकत नाही या वाक्याची प्रचिती देणारा खेळाडू सध्या पुण्यात आहे.

पुणे :जर मनात जिद्द असेल तर नशीबही आडवे येऊ शकत नाही या वाक्याची प्रचिती देणारा खेळाडू सध्या पुण्यात आहे. घरची कोणतीही पार्श्वभूमी नसताना, गवंडीकाम काम करून त्याने आत्तापर्यंत पाच वेळा 'भारत श्री' हा मानाचा किताब पटकावला आहे. त्याची कहाणी सगळ्यांनाच प्रेरणादायी आहे.

  याबाबत अधिक माहिती अशी की, गिरीश दिनकर पावडे कुटुंबासह सुमारे ३० वर्षांपूर्वी नांदेड जिल्ह्यातून पुण्यातील खुळेवाडी झोपडपट्टीत राहायला आले. यावेळी दहा बाय दहाच्या खोलीत राहताना संपूर्ण कुटुंब बांधकाम मजूर म्हणून काम करत होते. एके दिवशी चंदननगर भागात व्यायामासाठी जाणाऱ्या काही मुलांनी त्यांना हिणवलं आणि त्या दिवसापासून त्यांनी व्यायामाला सुरुवात केली. घरात खायची आबाळ असताना त्यांना लागणाऱ्या खुराकाची काळजी घेणे तर शक्यच नव्हते. पण त्याही स्थितीत खचून न जाता त्यांनी कसरत सुरु ठेवली. त्यांना त्यासाठी काही मित्रांनी मदतही केली. 

२००१ सालापासून त्यांनी पहिल्यांदा महाराष्ट्रभर विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि आजपर्यंत तब्ब्ल ११ वेळा महाराष्ट्र श्री किताब पटकावला आहे. हिमाचल प्रदेश-2016,दिल्ली-2015,  हरियाणा-2013, आसाम-2014, तमिळनाड-2017 या राज्यांमध्ये  “भारत श्री" किताब पटकविला आहे .मास्टर गटात दोन वेळा “भारत श्री "चा किताब पटकविला आहे. दुर्दैवाने त्यांचे घर अत्यंत लहान असल्यामुळे ही पदकेही पोत्यात भरून ठेवली आहेत. या कामगिरीमुळे त्यांनी एका जिममध्ये ट्रेनर म्हणून नोकरी मिळाली आहे.  दोन वर्षांपासून गवंडीकाम बंद केले आहे. 

या सगळ्या अनुभवाविषयी तो म्हणतो, ' अनेक वर्षांपासून हा प्रवास सुरु आहे. काहीवेळा अपयश आलं, नैराश्यही आलं पण त्यातूनही पुढे गेलो आणि त्यामुळेच इथंपर्यंत पोचू शकलो. अजूनही पुढे जायचे आहे, त्यासाठी मी कायम प्रयत्न करेन'. 

टॅग्स :bodybuildingशरीरसौष्ठवInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी