बांधकाम नियमावली सोमवारी सादर होणार
By Admin | Updated: November 4, 2015 04:12 IST2015-11-04T04:12:41+5:302015-11-04T04:12:41+5:30
पुणे शहर जुन्या हद्दीच्या विकास आराखड्याची बांधकाम नियंत्रण नियमावली सादर करण्यासाठीची मुदत येत्या ९ नोव्हेंबरला पूर्ण होत असल्यामुळे हा आराखडा तयार करणाऱ्या

बांधकाम नियमावली सोमवारी सादर होणार
पुणे : पुणे शहर जुन्या हद्दीच्या विकास आराखड्याची बांधकाम नियंत्रण नियमावली सादर करण्यासाठीची मुदत येत्या ९ नोव्हेंबरला पूर्ण होत असल्यामुळे हा आराखडा तयार करणाऱ्या त्रिसदस्यीय समितीकडून सध्या युद्धपातळीवर याबाबतचे काम सुरू आहे.
शहराचा विकास आराखडा तयार करण्याचा अधिकार त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा असतो. पुणे महापालिकेच्या नियोजन समितीकडून हा आराखडा मुदतीत तयार होत नसल्याचे कारण देत राज्य सरकारने तो काढून घेतला व त्यासाठी विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, महापालिका आयुक्त कुणाल कुमार व सहसंचालक नगर रचना प्रकाश भुक्ते अशी त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली. त्यांना ६ महिन्यांची मुदत देण्यात आली. या समितीने मुदतीत आराखडा तयार करून, तो राज्य सरकारला सादर केला; मात्र त्यासाठी बांधकाम नियंत्रण नियमावली तयार केली नव्हती. त्याासाठी समितीने राज्य सरकारकडे ४५ दिवसांची मुदत मागितली होती.
चोक्कलिंगम यांनी सांगितले की, येत्या सोमवारी (दि. ९) ४५ दिवसांची मुदत पूर्ण होत आहे. नियमावली तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही यावर टीका झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने आराखड्याच्या विरोधात मोर्चा काढला, तर काँग्रेसचे नगरसेवक संजय बालगुडे यांनी ‘रस्तारुंदीविरोधी कृती समिती’ स्थापन करून आंदोलन सुरू केले आहे.
विभागीय आयुक्तांच्या समितीने सप्टेंबर २०१५ अखेर हा डीपी राज्य शासनाकडे सादर केला आहे. डिसीरूल तयार करण्यासाठी सुमारे दोन महिन्यांची मुदत मागण्यात आली होती; मात्र डीपीला जानेवारी महिन्यात राज्यसरकार अंतिम मान्यता देणार आहे. त्यामुळे डीपीचे डीसीरूल येत्या ९ नोव्हेंबरपर्यंत तयार करण्याचे आदेश राज्यसरकारने विभागीय आयुक्तांच्या समितीला लेखी दिले आहे.