बांधकाम राडारोड्याची पालिकेकडून होणार वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:27 IST2020-12-13T04:27:30+5:302020-12-13T04:27:30+5:30
पालिकेचा हा उपक्रम सुरू झाल्यापासून बांधकाम व्यावसायिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे. शहरात दिवसाला किमान १०० टन बांधकाम ...

बांधकाम राडारोड्याची पालिकेकडून होणार वाहतूक
पालिकेचा हा उपक्रम सुरू झाल्यापासून बांधकाम व्यावसायिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे. शहरात दिवसाला किमान १०० टन बांधकाम राडारोडा तयार होत आहे. त्यावर प्रक्रिया करण्याकरिता पालिकेने सशुल्क सेवा सुरु केली आहे. पालिकेकडून चार वर्षांपुर्वी सुरु केलेली योजना अद्याप वेग पकडू शकलेली नाही. पालिकेने बांधकाम व्यावसायिकांनी राडारोडा पालिकेला द्यावा त्यावर प्रक्रिया करण्यासंदर्भात नोटीस काढली होती. प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जागा शहरात मिळत नसल्याने पालिकेसमोरील अडचणी संपत नाहीयेत.
पालिकेने बांधकाम व्यावसायिक ,शासकीय संस्था यांना यासंदर्भात नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. परंतू, नोंदणीलाही प्रतिसाद मिळाला नाही. पालिकेच्या बांधकाम विभागाने शहरातील सर्व बांधकाम व्यावसायिकांना माहिती कळवून नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी पुन्हा नव्याने या योजनेमध्ये लक्ष घालत राडारोडा प्रक्रिया प्रकल्पाला गती देण्यात येणार असल्याचे सांगितले.
------
पालिकेने एक किलोमिटर १ टनासाठी १९ रुपये दर ठरविला होता. त्याचबरोबर १९५ रुपये प्रक्रिया करण्यासाठी ठेकेदाराला देण्यात येणार होते. आता पालिका संकलन केंद्रापासून राडारोडा वाहून नेणार असल्याने वाहतुकीची सुविधा मोफत उपलब्ध होणार आहे.