बांधकामविषयक बातमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:09 IST2020-11-28T04:09:31+5:302020-11-28T04:09:31+5:30

............. सिंहगड रस्त्याची वाटचाल आता मध्यमर्गाकडून उच्चभ्रु वर्गाकडे ............. सिंहगड रोड इस्टेट असोसिएशनचे सदस्य अतुल खोले यांचे प्रतिपादन ...

Construction News | बांधकामविषयक बातमी

बांधकामविषयक बातमी

.............

सिंहगड रस्त्याची वाटचाल आता मध्यमर्गाकडून उच्चभ्रु वर्गाकडे

.............

सिंहगड रोड इस्टेट असोसिएशनचे सदस्य अतुल खोले यांचे प्रतिपादन

.....................................

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: गेल्या काही वर्षात शहराच्या मध्यवस्तीतील सदाशिव, नारायण, शनिवार पेठेतील नागरिक मोठ्या प्रमाणावर स्थायिक झाले, मात्र आता या परिसराची वाटचाल उच्चमध्यम वर्गाच्या पसंतीकडे होत आहे,असे प्रतिपादन सिंहगड रोड इस्टेट असोसिएशनचे सदस्य अतुल खोले यांनी केले.

सिंहगड रोड परिसरातील बांधकाम व्यवसायाचा आढावा घेतांना ते म्हणाले, सर्व सामान्यांपासून ते उच्चभ्रूंची पहिली पसंती या भागला मिळत आहे. आनंदनगर, हिंगणे, माणिकबाग यांचा त्यात विशेषत्वाने समावेश आहे.

साधारणत: १९९६ ते २००४ पर्यंत सिंहगड रोड म्हणजे सदाशिव, नारायण, शनिवार पेठेतील मध्यमवर्गीयांच्या पुढील पिढीचे वास्तव्याचे ठिकाण असे म्हटले जायचे. कारण मूळ पुण्यातील पेठ एरियातील नोकरदार मध्यमवर्गीयांनी मोठ्या प्रमाणावर आनंदनगर, माणिकबाग, हिंगणे येथे फ्लॅट घेतले. परंतु आता परिस्थिती बदललीय. संपूर्ण सिंहगड रोडवर आता मोठमोठ्या टाऊन्सशीप्स, मॅाल्स, इंटरनॅशनल ब्रँडच्या फ्रॅनचायजीज, मल्टीफ्लेक्स होत आहेत. याशिवाय सिंहगड रोडला फ्लॅट घेण्यामागे लोकांचा कल वाढतोय त्यामागे बरीच महत्त्वाची कारणे आहेत.

त्यात प्रामुख्याने पुढील कारणांचा समावेश आहे: मूलभूत गरजांची उपलब्धता, पाण्याची मुबलकता,

भविष्यात होणारी नागरी सोयी-सुविधांची कामे, नवे रस्ते, नदीवरील पूल, फ्लायओव्हर्स,

नामांकित शाळा, कॉलेज, क्लासेस आदी शैक्षणिक सुविधा.

तसेच उद्याने, स्वीमिंग पूल यांचा समावेश आहे.

याशिवाय, मुख्य म्हणजे सिंहगड रोडवरून शहराच्या इतर विविध भागांत व इतर जिल्ह्यांत जाण्यासाठी असलेली कनेक्टीव्हिटी व रस्ते होत.

औद्योगिक दृष्ट्यादेखील सिंहगड रोडचे महत्त्व वाढत आहे व त्यामुळे पर्यायाने येथील वस्तीदेखील वाढतेय. छोटेमोठे कारखाने, इंडस्ट्रीयल एरिया, आयटीआय हब, हायवे कनेक्टीव्हिटी, दळणवळणाचे जाळे निर्माण झाले आहे.

आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, पुणे शहरात सर्वत्र सिमेंटचे जंगल वाढत असताना सिंहगड रस्त्यावर, निसर्ग, झाडे यांचे अस्तीत्व अजूनही बर्‍यापैकी आहे. सिंहगड रस्त्याला लाभलेले निसर्गाचे वरदान व ऐतिहासिक महत्त्व त्यामुळे ओघाओघानेच घर खरेदीसाठीचे सर्वांत योग्य ठिकाण म्हणजे सिंहगड रोड होय, असेही खोले म्हणाले.

Web Title: Construction News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.