राज्यघटना खरा धर्म : शेषराव मोरे
By Admin | Updated: January 21, 2016 00:57 IST2016-01-21T00:57:30+5:302016-01-21T00:57:30+5:30
राष्ट्रपतीकडून राज्यघटनेची शिकवण मिळते तर परमेश्वराकडुन धर्मग्रंथाची. परमेश्वर मानायचा की नाही याचे अधिकार दिलेत राज्यघटनेने, परंतु राज्यघटना मानायची की नाही

राज्यघटना खरा धर्म : शेषराव मोरे
पुणे : राष्ट्रपतीकडून राज्यघटनेची शिकवण मिळते तर परमेश्वराकडुन धर्मग्रंथाची. परमेश्वर मानायचा की नाही याचे अधिकार दिलेत राज्यघटनेने, परंतु राज्यघटना मानायची की नाही, याचे अधिकार परमेश्वराने देखील दिले नाहीत. वेद आणि राज्यघटना यांच्यात विरोध आला तर तुम्ही कोणाला श्रेष्ठ मानणार हा प्रश्न विद्यार्थांसमोर उपस्थित करीत, धार्मिक स्वातंत्र्य घटनेत मिळणार नाही, त्यामुळे धर्मग्रंथ बंद करा, राज्यघटना हाच खरा धर्म असल्याचे प्रतिपादन विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शेषराव मोरे यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ विदयार्थि कल्याण मंडळ व फर्ग्युसन महाविदयालय पुणे विदयार्थि कल्याण मंडळ यांच्या वतीने आयोजित आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभ अॅम्फी थिएटर मध्ये पार पडले. त्यावेळी मोरे बोलत होते. (प्रतिनिधी)