पुणे : 'एक धाव समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुत्वासाठी...एक धाव आपल्या संविधानासाठी' असा उद्घोष करीत पुणेकर रविवारी सकाळी संविधानाच्या सन्मानासाठी धावले. निमित्त होते, भारतीय संविधान दिनानिमित्त संविधान सन्मान समितीच्या वतीने संविधान जागर सप्ताहात आयोजित संविधान दौडचे. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील आंबडेकर पुतळ्यापासून सणस मैदानापर्यंत ही संविधान दौड पार पडली. रविवारी सात वाजता महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे महाराष्ट्र सचिव व संविधान दौडचे मुख्य संयोजक बाळासाहेब जानराव, पश्चिम महाराष्ट्र आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, नगरसेविका सुनीता वाडेकर, शहराध्यक्ष अशोक कांबळे, महेश शिंदे, नीलेश आल्हाट, विठ्ठल गायकवाड, शाम गायकवाड, बसवराज गायकवाड, बाबुराव घाडगे, संदीप धांडोरे यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते या संविधान दौडचे आंबेडकर पुतळ्याजवळ उद्घाटन झाले. सणस मैदानावर या दौडची सांगता झाली. महाराष्ट्र अँथलेटिक संघाचे अध्यक्ष अभय छाजेड यांच्या हस्ते दौडमधील सहभागी स्पर्धकांना गौरविण्यात आले. त्यामध्ये पुरुष गटात रविकुमार महतो, स्वामीनाथ आसवले, अब्दुल कुरैशी, प्रेम कांबले, शब्बीर मंसूरी, दीपक शुक्ला, मोबिन शेख, सुदेश कदम, अशोक जाधव, रतन बोदरे, अक्षय कांबळे, भूषण बांगरे, स्वस्तिक कस्बे, अजय ठाकुर, बबन वाघचौरे यांना, तर महिला गटात रसिका पवार, प्रतिक्षा खरात, रईसा चम्बूर, सोनाली कोकाटे, श्रद्धा मांजरे यांना आणि अपंग गटात बबन बोराडे यांना सन्मानित करण्यात आले.
भारतीय संविधान दिनानिमित्त संविधान दौड
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2018 16:13 IST