संविधान दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:00 IST2020-11-28T04:00:06+5:302020-11-28T04:00:06+5:30
................................................ एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, राजबाग, लोणी काळभोर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण ...

संविधान दिन
................................................
एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, राजबाग, लोणी काळभोर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संविधानाच्या उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले. यावेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. वसंत पवार, डॉ. असावरी भावे, डॉ. राहुल मोर, शिवशरण माळी, ज्ञानदेव निलवर्ण, डॉ. प्रदीप प्रभू, डॉ. जयश्री फडणवीस, रश्मी पारखी यांच्यासह सर्व विभागाचे अधिष्ठाता, संचालक, प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत संविधान दिवस मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला.
.....…............................................
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एंग्लो उर्दू बॉईज हायस्कूल येथे ''''''''संविधान दिन '''''''' साजरा करण्यात आला. प्राचार्य परवीन शेख यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थितांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले.
..................................................................
राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांच्या हस्ते संविधानाचे पूजन करण्यात आले. यावेळी आमदार चेतन तुपे पाटील, वैजनाथ वाघमारे, मोहन सोनवणे, विजय बगाडे, सुरेश खाटपे, निलम शिंदे आदी उपस्थित होते.
......................................................
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाच्या वतीने पुणे स्टेशन येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पूजा लाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच २६/११ ला मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना आणि नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष आनंद सवाणे, स्वप्नील गांगुर्डे, विशाल मोरे, सागर शेंडगे, आकाश वाघ, शुभम माने आदी उपस्थित होते.