शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
2
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
3
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
4
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
5
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
6
अचानक बेपत्ता झाली होती बॉलिवूड अभिनेत्री; ११ महिन्यांनी सापडला हाडांचा सांगाडा
7
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
8
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
9
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
10
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
11
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
12
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
13
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
14
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
15
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
16
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
17
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
18
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
19
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
20
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य

मोबदला रक्कम गृहीत धरून प्रकल्पाची आखणी ‘न’ परवडणारीच

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 12:57 PM

पालिकेकडे भूसंपादनाचा निश्चित आकडा नाही..

ठळक मुद्देएचसीएमटीआर प्रकल्पाच्या कित्येकपट जास्त द्यावा लागणार जागेचा मोबदलापालिकेचा भूसंपादनापोटीचा मोबदला हास्यास्पद 

पुणे : ‘एचसीएमटीआर’ (उच्च क्षमता वाहतूक मार्ग ) प्रकल्पाकरिता पालिका प्रशासनाने नव्याने अंमलबजावणीची कार्यवाही सुरू केली आहे़. या प्रकल्पाचा फिजिबिलिटी रिपोर्ट तयार करताना, प्रकल्पबाधितांना गृहीत धरून खर्चाची गणिते मांडली गेली आहेत़. परंतु, त्यांची ही गणिते व प्रकल्प विरोधकांनी केलेला दावा यात जमीन-आस्मानाचा फरक आहे़. प्रकल्पासाठी भूसंपादन करताना संबंधितांना नियमानुसार पालिकेला द्यावी लागणारी रक्कम हीच एकूण प्रकल्प खर्चाच्या कित्येकपटीने अधिक असल्याचा दावा कायद्याच्या आधारे नागरिक कृती समितीने केला आहे़. एचसीएमटीआर प्रकल्पाकरिता  ५,१९२ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरून, अधिक २,४०० कोटी रुपये भूसंपादनासाठी गृहित धरले गेले आहेत. भूसंपादन करताना ‘एमआरटीपी कायदा कलम १२६’ नुसार सार्वजनिक विकासाकरिता जमीन ताब्यात घेताना पालिकेला, जमीनमालक यांच्याशी चर्चेतून निश्चित रकमेचा करारनामा करून (१), भूसंपादन कायदा २०१३ च्या कलम २६ अन्वये असलेल्या तरतुदीनुसारची मोबदला रक्कम देऊन (२) आणि भूसंपादनाच्या मोबदल्यात ‘एफएसआय’ व ‘टीडीआर’ देऊन (३) भूसंपादन करता येणार आहे़. या भूसंपादन प्रक्रियेत जागामालकांना वरील तीनही पर्याय खुले असून, यातील कुठला पर्याय निवडायचा, हा सर्वस्वी त्यांचा अधिकार असून, कायद्याने तसे त्यांना स्वातंत्र्य दिले आहे़. पण आजमितीला प्रशासन केवळ ‘टीडीआर’ व ‘एफएसआय’रूपी मोबदला देऊन अथवा मोबदला रक्कम स्वत: निश्चित करूनच ही आर्थिक गणिते बांधत आहे़.  त्यानुसारच २,४०० कोटी रुपयांचा मोबदला गृहीत धरला गेला असला, तरी याचा तपशील मात्र सविस्तर दिला गेलेला नाही़.  सर्वात कळीचा मुद्दा असलेल्या तिसऱ्या पर्यायाची शक्यताच पालिकेने गृहीत धरलेली नाही़. भूधारकांनी तिसºया पर्यायानुसार मोबदला मिळाला तरच जागा देण्याची भूमिका घेतली असून, हा पर्याय म्हणजे पालिकेला नाकापेक्षा मोती जड ठरणार आहे़. .....पालिकेचा भूसंपादनापोटीचा मोबदला हास्यास्पद एचसीएमटीआर प्रकल्पासाठी भूसंपादनापोटी पालिकेने २४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे़ मात्र ही तरतूद हास्यास्पद आहे़ या प्रकल्पात जाणाºया जमिनी, बांधकामे, संबंधितांचे नुकसान पाहता हा सर्व खर्च भरून देणे पालिकेच्या तिजोरीला डोईजड ठरणार आहे़ - अ‍ॅड़ रितेश कुळकर्णी, नागरिक कृती समिती़ ......भूसंपादन कायदा २०१३ मधील कलम २६ नुसार, मोबदल्याची रक्कम निश्चित करावयाची झाल्यास, रेडिरेकनर व त्या परिसरातील जास्तीत जास्त किमतीच्या खरेदीखतांपैकी जास्त दराच्या ५०% खरेदीखतांची सरासरी व यापैकी जो दर जास्त असेल त्याप्रमाणे मोबदला देणे हे महापालिकेला बंधनकारक राहणार आहे़ यात जागामालक, त्याच्या मिळकतीचा प्रचलित रेडिरेकनरदर, संपादनाखाली असलेल्या जमिनीच्याजवळील जमिनींची खेरदीखते विचारात घेऊन त्याच्या सरासरीतून मिळणारा जमिनीचा दर मागण्यास कायद्याने पात्र आहे़४संपादित होणाºया जागेवर बांधकाम असेल तर त्या बांधकामाचे आजच्या दराने बाजारमूल्य, व्यावसायिक इमारत असेल तर त्याद्वारे पुढील दहा वर्षांत मिळणारे उत्पन्न व पुनर्वसन करण्यासाठीचा खर्च हाही देणे बंधनकारक आहे़ ...........पालिकेकडे भूसंपादनाचा निश्चित आकडा नाहीया प्रकल्पासाठी प्रकल्पाच्या लांबीतील किती मालमत्ता बाधित होत आहेत, किती जागांचे भूसंपादन करावे लागेल, याचा कुठलाही तपशील पालिकेकडे नाही़ केवळ एकूण प्रकल्पाच्या सुमारे २० टक्के खासगी जागेचे भूसंपादन करावे लागेल, असेच सांगितले जात आहे़ दुसरीकडे ‘टीडीआर’चे घसरलेले बाजारमूल्य व ‘एफएसआय’ वापरण्यावर संबंधितांवर येणाºया मर्यादा याकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे़ 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका