देशाच्या जडणघडणीत काँग्रेसचे योगदान मोठे : जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:15 IST2020-12-30T04:15:07+5:302020-12-30T04:15:07+5:30

सोमवारी ( दि २८ ) सासवड येथील पुरंदर काँग्रेसच्या कार्यालयात काँग्रेसचा १३६ वा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी ...

Congress's contribution to the country's development is great: Jagtap | देशाच्या जडणघडणीत काँग्रेसचे योगदान मोठे : जगताप

देशाच्या जडणघडणीत काँग्रेसचे योगदान मोठे : जगताप

सोमवारी ( दि २८ ) सासवड येथील पुरंदर काँग्रेसच्या कार्यालयात काँग्रेसचा १३६ वा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी आ संजय जगताप यांच्या हस्ते दिवणगत लोकनेते चंदूकाका जगताप यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते सखाराम लांडगे, भगवान म्हेत्रे, संजय जाळींद्रे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, जि प सदस्य दत्ता झुरंगे, नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, महिलाध्यक्षा व पं स सदस्या सुनीता कोलते, सोनाली यादव, नगरसेवक विजय वढणे, यशवंत जगताप, बाळासो पायगुडे, संजय चौरे, नंदू जगताप, भारत चौखंडे, ऍड पूनम शिंदे, विठ्ठल मोकाशी, चंद्रकांत हिवरकर, सागर घाटगे, रागिणी जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते. सागर जगताप यांनी सुत्रसंचलन केले तर माउली यादव यांनी आभार मानले.

--

फोटोओळ :- काँग्रेसच्या वर्धापनानिमित्त सासवड येथील पुरंदर काँग्रेस कार्यालयात आ संजय जगताप यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Congress's contribution to the country's development is great: Jagtap