काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचावे : हर्षवर्धन पाटील
By Admin | Updated: January 14, 2017 03:22 IST2017-01-14T03:22:33+5:302017-01-14T03:22:33+5:30
काँग्रेस पक्षाच्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांनी जनतेचे प्रश्न सोडवावेत तसेच पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचावे : हर्षवर्धन पाटील
बावडा : काँग्रेस पक्षाच्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांनी जनतेचे प्रश्न सोडवावेत तसेच पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे काम करावे, असे आवाहन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.
शहाजीनगर (ता. इंदापूर) येथे इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध २४ सेलच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक करणेसंदर्भात रविवारी (दि. ८) आयोजित मेळाव्यात मार्गदर्शन करताना हर्षवर्धन पाटील बोलत होते. इंदापूर येथे गुरुवारी (दि. १२) दुपारी १ वाजता काँग्रेसच्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांना नेमणूकपत्रे देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी काळात सेलवर आणखी कार्यकर्त्यांना संधी देण्यात येणार आहे.
तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कृष्णाजी यादव यांनी प्रास्ताविक केले. रघुनाथ पान्हाळकर यांनी सूत्रसंचालन केले.
कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याचे संचालक अंबादास
शिंगाडे यांनी आभार मानले. या वेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)