शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

काॅंग्रेस हा विचार असून ताे कधीही मरणार नाही : बी. जे. खताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 14:10 IST

महाराष्ट्राच्या पहिल्या मंत्रीमंडळातले मंत्री असलेले विजय खताळ हे येत्या 26 मार्चला अापल्या वयाची शंभरी पार करत अाहेत. खताळ हे दीर्धकाळ महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय हाेते. त्यांनी बुधवारी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला.

ठळक मुद्देकाॅंग्रेस हा गांधीजींनी दिलेला विचारगांधी कुटुंबावरील घराणेशाहीचा अाराेप चुकीचा

पुणे : काँग्रेस ही केवळ एक संघटना नसून तो एक विचार आहे. आणि तो महात्मा गांधीनी दिलेला विचार आहे. त्यामुळे काँग्रेस हा विचार कधीही मरणार नाही, असे मत महाराष्ट्राच्या पहिल्या मंत्रीमंडळातले मंत्री बी.जे.खताळ यांनी व्यक्त केले.     श्री आदीशक्ती फाऊंडेशनच्या वतीने शनिवार पेठेतील साधना मिडिया सेंटर येथे खताळ यांच्याशी संवादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी साधनाचे संपादक विनोद शिरसाठ, श्री आदिशक्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष दत्ता पवार, खताळ यांचे पुतणे संतोष खताळ आदी उपस्थित होते.     चले जावचे आंदोलन, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, पहिल्या मंत्रीमंडळाची स्थापना, विविध मुख्यमंत्र्यांबरोबरचे अनुभव, निर्णय घेताना पाळलेली तत्त्वनिष्ठा, गांधी घराण्याची परंपरा, राजकारणाची सद्यस्थिती, सक्रिय राजकारणापासून दूर जात जगत असलेले आनंदी आणि समाधानी जीवन, आरोग्यसंपन्न शरीरयष्टी अशा वेगवेगळ्या विषयांवर खताळ यांनी आपल्या कडक शिस्तीच्या शैलीत परखड उत्त्तरे दिली.    खताळ म्हणाले, राजकारणात येण्याआधी राजकारण कश्यासाठी करायचे हे ठरवायला हवे. त्याग हा राजकारणाचा पाया आहे. वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण हे माझे आवडते मुख्यमंत्री होते. सरकार कसे चालवायला हवे याचे योग्य ज्ञान असलेली ही दोन व्यक्तिमत्वे होती. काँग्रसमधील घराणेशाही बाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, लोकांनी इंदिरा गांधी व राजीव गांधी यांना  लोकांनी स्विकारलं होतं. अलीकडे राहुल गांधीनाही लोकांनी स्विकारले आहे, त्यामुळे याला घराणेशाही म्हणता येणार नाही.     ए. आर. अंतुले यांचे सरकार पडल्याची आठवण सांगताना खताळ म्हणले, सत्ता मिळाल्यावर काहीही करता येते, असे अंतुलेंना वाटत होते. त्यामुळे अंतुलेंच्या सरकारला त्याकाळी पायऊतार व्हावे लागले होते. राजकारणाचा अर्थ योग्यरित्या समजून घेतला, तर जनतेच्या कल्याणासाठी फायदेशीर ठरेल. सरकार जनतेचे असते. सत्ता आपल्या हातात आहे, म्हणजे आपण हवे ते करु शकू, ही भावना आपल्या मनात असता कामा नये. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन राजकारण करायला हवे. 

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसPoliticsराजकारण