शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

काॅंग्रेस कार्यकर्त्यांकडून मोदींना लिहिली ‘रक्ताळलेली’ ५० पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 17:13 IST

काश्मिरमधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या असून पुण्यातील काॅंग्रेसच्या ५० कार्यकर्त्यांनी रक्ताने पत्र लिहिली आहेत.

पुणे : काश्मिरमधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या असून पुण्यातील काॅंग्रेसच्या ५० कार्यकर्त्यांनी रक्ताने पत्र लिहिली आहेत. या हल्ल्याला मोदी आणि त्यांचे सरकार जबाबदार असल्याचा आरोप पत्रांद्वारे करण्यात आला असून राजीमान्याचीही मागणी यामध्ये करण्यात आली आहे. 

पुणे शहर काॅंग्रेसचे सरचिटणीस अमित आबा बागूल आणि त्यांच्या ४९ कार्यकर्त्यांनी ही पत्रे लिहिली आहेत. पुलवामा येथे झालेला हल्ला दुर्दैवी असून त्याला मोदी आणि त्यांच्या सरकारला दोषी धरायला हवे. गेल्या पाच वर्षात वारंवार अशा घटना घडत आहेत. त्यामुळे पंतप्रधानपदाची खुर्ची शहिदांच्या रक्ताने माखली आहे. त्याला सर्वस्वी मोदी जबाबदार आहेत. वारंवार देशाचे सैनिक शहीद होत असताना आपली ५६ इंच छाती कुठे गेली असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. शहिदांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये यासाठी भारतीय लष्कर त्याचा अवश्य बदला घेईलच. आमचा सैन्यदलांवर पूर्ण विश्वास आहे. मात्र, मोदी आणि भाजपावर अजिबात विश्वास राहिलेला नाही. मोदींचा राजीनामा हिच सैनिकांना खरी श्रद्धांजली असेल असेही या पत्रांमध्ये नमूद करण्यात आले आहे. 

‘प्रिय मोदीजी मन की बात के बदले खून की बात चाहीये’, ‘इंडीया डिमांड रिअल सर्जिकल स्ट्राईक’,  ‘हमे निंदा चाहिये... और एक भी आतंकी जिन्दा नही चाहिए’, ‘जगाच्या पाठीवरुन पाकिस्तानचे नाव मिटवा’,  ‘नोटबंदी नको तर दहशतवाद बंदी करा’ अशा अनेक जळजळीत प्रतिक्रिया असलेली ही पत्र आहेत. या हल्ल्यातील मृतांचा आकडा ४४ वर जाऊन पोचला आहे. या हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट आली असून पाकिस्तानकडून याचा बदला घेतला पाहिजे अशा प्रतिक्रिया सर्वसामान्यांकडून येऊ लागल्या आहेत. अनेकांनी केंद्र शासनाला पत्र आणि ईमेल पाठवून आपल्या प्रतिक्रिया कळविल्या आहेत. मात्र, बागूल आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वत:च्या रक्ताने लिहिलेली पत्र पाठवून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हे पत्र कुरीअर आणि ईमेलद्वारे मोदींना पाठविण्यात येणार आहेत. ज्या प्रकारे सर्जीकल स्ट्राईकचे श्रेय मोदी घेतात तसेच या हल्ल्यामुळे आलेले अपयशही स्विकारले पाहिजे असे बागूल म्हणाले. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाPuneपुणेcongressकाँग्रेस