पुण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत बिघाडी
By Admin | Updated: January 31, 2017 11:09 IST2017-01-31T11:06:07+5:302017-01-31T11:09:53+5:30
शिवसेना-भाजपातील युती तुटीनंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत बिघाडी झाली आहे.

पुण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत बिघाडी
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 31 - शिवसेना-भाजपातील युती तुटीनंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत बिघाडी झाली आहे. आगामी पुणे महानगपालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार नाही. आज यासंदर्भातील अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
जागावाटपाचा तिढा न सुटल्याने काँग्रेसचा स्वतंत्र लढण्याचा निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे. तर मुंबईत काँग्रेस आज पहिली यादी जाहीर करणार आहे. पुण्यात काँग्रेसला 67 जागा हव्या होत्या, मात्र राष्ट्रवादीने याला नकार देत 60 जागा देऊ केल्या होत्या. त्यामुळे जागावाटपावरुन आघाडीत बिघाडी झाली.
'राष्ट्रवादीची पहिली यादी उद्या'
आघाडी तुटल्याची किंवा इतर कोणतीही माहिती काँग्रेसकडून आम्हाला दिली गेलेली नाही. जर काँग्रेसकडून कोणतीही माहिती मिळाली तरी राष्ट्रवादीची पहिली यादी उद्या जाहीर करणार : वंदना चव्हाण, पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष व खासदार