काँग्रेस- राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी

By Admin | Updated: October 16, 2014 06:10 IST2014-10-16T06:10:52+5:302014-10-16T06:10:52+5:30

येथील गंगा हाईट्स चौकात कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत दुपारी मारामारी झाली. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Congress-NCP workers wage fight | काँग्रेस- राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी

काँग्रेस- राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी

खडकी : येथील गंगा हाईट्स चौकात कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत दुपारी मारामारी झाली. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केला नाही. सांयकाळी साडेपाचच्या सुमारास पोलिस दाखल झाले. त्यांनी बूथ वरील साहित्य खाली फेकले व वृद्धाना ढकलत बाहेर काढले. त्यामुळे संपूर्ण चौक रिकामा झाला, दुपारी घडलेल्या मारामारी प्रकारावर नियंत्रण राखण्यासाठी जमावाला हाकलण्यात आले, असे खडकी पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र विभांडिक यांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत खडकी बाजार पोलिस चौकीत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. खडकी परिसरात दुपारपर्यंत शांततेत मतदान झाले. दुपारनंतर दोन गटात मारामारी झाल्याने तणावाचे वातावरण झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Congress-NCP workers wage fight