शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

'ज्या राज ठाकरेंना आम्ही पाहिलं ते...'; मनसे-शिंदे सेनेच्या जवळीकीवर बाळासाहेब थोरात रोखठोक बोलले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 13:40 IST

राज ठाकरेंमध्ये पूर्वीसारखा लढाऊबाणा आता राहिलेला नाही, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

पुणे-

राज्याच्या राजकारणात आता आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिंदे सेनेची नवी समीकरणं पाहायला मिळू शकतात असं विचारण्यात आलं असता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज ठाकरेंमध्ये पूर्वीसारखा लढाऊबाणा आता राहिलेला नाही. आम्ही ज्या राज ठाकरेंना पाहिलं होतं ते आता पूर्वीसारखे राज ठाकरे राहिलेले नाहीत, असा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला. ते पुण्यात एका सार्वजनिक गणपती दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. 

राज ठाकरे यांचे १८ सप्टेंबरपासून ‘मिशन विदर्भ’; नागपूर, चंद्रपूर व अमरावती महापालिकेवर फोकस

"मनसे आणि शिंदे सेना एकत्र येतीलही शेवटी आता असं आहे की राज ठाकरे पूर्वी जे होते तसे राहिलेले नाहीत. खरे राज ठाकरे आम्ही त्यावेळी पाहिले होते. पण आता राज ठाकरेंमध्ये लढाऊबाणा राहिलेला नाही", असं बाळासाहेब थोरात म्हणाले. त्यांनी यावेळी भाजपावरही जोरदार निशाणा साधला. भाजपाला काहीही करा पण सत्ता हवी हेच त्यांचं धोरण झालं असल्याचं थोरात म्हणाले. 

भाजपाला फक्त सत्ता हवी"काही करा पण सत्ता हवी हेच भाजपाचं धोरण झालं आहे. लोकशाहीला हे अभिप्रेत नाही. सत्ते करता काहीही हेच अमित शहांच्या भाषणातही दिसून आलं. पण महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा आमचा प्रयत्न यापुढील काळातही सुरूच राहणार आहे. महाविकास आघाडी आजही एकत्र आहे. भाजपाची कार्यप्रणाली लोकशाहीला अनुकूल नाही. त्यामुळे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील राहील. आगामी काळात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळे असा विश्वास आहे", असं बाळासाहेब थोरात म्हणाले. 

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे