काँग्रेसने केलेल्या कामांचीच उद्घाटने !

By Admin | Updated: August 24, 2014 01:07 IST2014-08-24T01:07:04+5:302014-08-24T01:07:04+5:30

आगामी पाच वर्षे जरी मोदी उद्घाटने करीत फिरले तरी ती संपणार नाहीत, अशी टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.

Congress inaugurated the work done by Congress! | काँग्रेसने केलेल्या कामांचीच उद्घाटने !

काँग्रेसने केलेल्या कामांचीच उद्घाटने !

क:हाड (जि़ सातारा) : काँग्रेसने केलेल्या कामांचेच पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या उद्घाटने करीत आहेत. आगामी पाच वर्षे जरी मोदी उद्घाटने करीत फिरले तरी ती संपणार नाहीत, अशी टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.
मुख्यमंत्री म्हणाले, आघाडीतील जागा वाटपाची चर्चा दिल्लीत झाली आहे. आम्ही 174 मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत; पण निवडून येण्याची क्षमता तपासून एखादा इच्छुक मुलाखतीला आला नसला, तरी त्याचा विचार होऊ शकतो, असे मुख्यमंत्री चव्हाण म्हणाल़े ‘क:हाड दक्षिण’वरील स्वारीचा ‘सस्पेन्स’ कधी संपणार? असा प्रश्न विचारताच ‘संपेल आणि तुम्हाला लवकरच समजेल,’ असे सूचक उत्तर मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिले; पण नेमका ‘सस्पेन्स’ कधी संपणार, हे सांगणो मात्र त्यांनी टाळले.
 
आरक्षणाचे प्रस्ताव केंद्राकडेच पाठवावे लागतात
धनगर आणि लिंगायत समाजाचे आरक्षणाचे प्रस्ताव केंद्राकडे पाठविले जाणार असल्याने ते लटकणार काय? असे छेडले असता मुख्यमंत्री चव्हाण यांनी प्रस्ताव केंद्राकडेच पाठवावे लागतात, असे सांगितले. मात्र, मग लिंगायत समाजासाठी नेमलेली मंत्री सोपल समिती काय कामाची? यावर मात्र त्यांनी उत्तर देणो टाळले.

 

Web Title: Congress inaugurated the work done by Congress!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.