खेड, जुन्नरमध्ये शिवसेनेला काँग्रेसचा हात
By Admin | Updated: March 15, 2017 03:23 IST2017-03-15T03:23:23+5:302017-03-15T03:23:23+5:30
जिल्हा परिषद, पंचायत समिती निकालानंतर लक्ष लागलेल्या सभापती, उपसभापती निवडणुकीत जिल्ह्यात एक वेगळा पॅटर्न पहावयास मिळाला

खेड, जुन्नरमध्ये शिवसेनेला काँग्रेसचा हात
पुणे : जिल्हा परिषद, पंचायत समिती निकालानंतर लक्ष लागलेल्या सभापती, उपसभापती निवडणुकीत जिल्ह्यात एक वेगळा पॅटर्न पहावयास मिळाला. जुन्नर व खेड तालुक्यात शिवसेनेला काँग्रेसने ‘हात’ दिला असून येथे उपसभापतिपद पदरात पाडले आहे. तर १३ पैैकी सात पंचायत समितीवर राष्ट्रवादीने दोन्ही पदांवर वर्चस्व मिळवले आहे. दोन ठिकाणी काँग्रेसचे, तीन ठिकाणी शिवसेना तर एका ठिकाणी भाजपाचे सभापती झाले आहेत.
२१ फेबु्रवारी रोजी जिल्हा परिषद व १३ पंचायत समितीसाठी निवडणूक झाली. २३ फेबु्रवारी रोजी निकाल लागून राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेत बहुमत मिळवले. ७५ पैैकी ४४ जागा मिळवल्या. तर आंबेगाव, बारामती, भोर, दौैंड, शिरूर, मुळशी या पंचायत समित्यांत बहुमत मिळवले होते. येथे राष्ट्रवादी काँग्रेसला दोन्ही पदे मिळवता आली आहेत. तसेच पूर्ण बहुमत न मिळालेल्या वेलीत सभापती व उपसभापतीही राष्ट्रवादीचे झाले आहेत. जिल्ह्यातील सर्वांत मोठा तालुका असलेल्या हवेली पंचायत समितीत २६ सदस्य असून त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे १३, भारतीय जनता पक्षाचे ६, तर शिवसेनेचे ५ व २ अपक्ष असे पक्षीय बलाबल झाले होते. त्रिशंकू अवस्थेत बाजी मारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला एकाची साथ मिळणे आवश्यक होते. ती कमतरता लोणी काळभोर गणातून अपक्ष निवडून आलेले उमेदवार युगंधर ऊर्फ सनी काळभोर यांनी सहयोगी सदस्यत्व स्वीकारून राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यांमुळेच हवेलीचे सभापती व उपसभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले आहे.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर तालुक्यात जिल्हा परिषदेत त्यांना जागा मिळविन्यात अपयश आले होते. मात्र पंचायत समितीवर त्यांचे वर्चस्व राखले होते. आज झालेल्या सभापती, उपसभापती निवडणुकीतही त्यांनी आपले वर्चस्व राखले आहे. तसेच वेल्हा तालुक्यात काँग्रेसने आपले वर्चस्व राखले आहे.
गेल्या वर्षी जिल्ह्यात फक्त जुन्नर पंचायत समिती ताब्यात असलेल्या शिवसेनेने यावर्षी पुरंदर व खेड या दोन पंचायत समित्यांवर भगवा फडकावला आहे. पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादीला हद्दपार करीत शिवसेनेने ३ जिल्हा परिषद गट व सहा पंचायत समिती गण ताब्यात घेतले होते. त्यामुळे तेथे शिवसेनेने दोन्ही पदे घेतली आहेत. खेड तालुक्यातही शिवसेनेचे सभापती व उपसभापती झाले आहेत. राज्यात विजयाची घौैडदौैड सुरू असलेल्या भाजपाला मात्र जिल्ह्यात शिरकाव करता आला नाही. पूर्वीची त्यांच्या ताब्यात असलेली मावळ पंचायत समितीचे फक्त त्यांचे सभापती व उपसभापती झाले आहेत.
जुन्नर पंचायत समितीच्या निवडणुकीत १४ जागा पैकी ७ जागा शिवसेनेने काबीज केल्या होत्या तर राष्ट्रवादी काँग्रेसने ६ जागांवर विजय मिळविला होता.
तालुका सभापती पक्ष उपसभापती पक्ष
आंबेगाबउषा रमेश कानडेरा. कॉँनंदकुमार शंकर सोनावलेरा. कॉँ
बारामतीसंजय पंडीत भोसलेरा. कॉँशारदा राजेंद्र खराडेरा. कॉँ
भोर मंगल सोपान बोडकेरा. कॉँलहू हरिभाऊ शेलाररा. कॉँ
दौंड मीना दिनकर धायगुडेरा. कॉँसुशांत सुनील दरेकररा. कॉँ
हवेलीवैशाली गणेश महाडीकरा. कॉँअजिंक्य सुरेश घुलेरा. कॉँ
इंदापूरकरणसिंह अविनाश घोलपकॉँग्रेसदेवराज कोंडीबा जाधवकॉँग्रेस
जुन्नरललिता उमेश चव्हाणशिवसेनाउदय बाबासाहेब भोपेकॉँग्रेस
खेड सुभद्रा विष्णू शिंदेशिवसेनाअमोल गुलाबराव पवारकॉँग्रेस
मावळगुलाबराव गोविंद माळसकरभाजपाशांताराम सीताराम कदमभाजपा
मुळशीकोमल गणेश वाशिवलेरा. कॉँ.पांडुरंग मारुती ओझरकररा. कॉँ
पुरंदरअतुल रमेश म्हस्केशिवसेनादत्तात्रय शंकर काळेशिवसेना
शिरूरसुभाष बापूराव उमापरा. कॉँमोनिका नवनाथ हरगुडेरा. कॉँ
वेल्हासीमा विष्णू राऊतकॉँग्रेसदिनकर पांडुरंग सरपालेकॉँग्रेस