शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

‘काँग्रेस कनेक्ट’ अभियानाचा पुण्यातून होणार शुभारंभ; अशोक चव्हाण करणार उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 12:35 IST

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. २ ते ९ डिसेंबर २०१७ दरम्यान विविध कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली.

ठळक मुद्दे२ ते ९ डिसेंबर २०१७ दरम्यान काँग्रेस कनेक्ट अभियानाचा प्रारंभअशोक चव्हाण यांच्या हस्ते २ डिसेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार उद्घाटन

पुणे : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. २ ते ९ डिसेंबर २०१७ दरम्यान महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांचे मार्गदर्शन, काँग्रेस कनेक्ट अभियानाचा प्रारंभ, १२५ वर्षे पूर्ण झालेल्या गणेशोत्सव मंडळांचा सन्मान, विद्यापीठे आणि विद्यमान सरकारची धोरणे, रेडिओचे सामाजिक प्रश्न सोडविण्यातील योगदान याबद्दल परिसंवाद, दिव्यांग मुलांसोबत आनंदोत्सव, चित्रकला स्पर्धा, सशस्त्र सुरक्षा दलाचा ध्वज दिन कार्यक्रम, तरुणांसाठी नोकरी मेळावा, जागर स्त्री शक्तीचा कार्यक्रमात बचतगटातील महिलांचा स्व. इंदिरा गांधी जन्मशताब्दी उद्योगिनी सन्मान यांसह विविध कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली.सप्ताहाचे उद्घाटन महाराष्ट्राचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या हस्ते शनिवार २ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सुशीलकुमार शिंदे असणार आहेत. सप्ताहातील विविध कार्यक्रमांमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उल्हास पवार, शरद रणपिसे, रमेश बागवे, अनंत गाडगीळ यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सध्या, काँग्रेसने गेल्या ६० वर्षांत काहीही केले नाही, असा अपप्रचार केला जात आहे. त्यामुळे या काँग्रेसी योजनांचाच लाभ घेऊन पुढे आलेली युवा पिढी आणि दूर गेलेला सुशिक्षित वर्ग या अपप्रचाराला बळी पडला. त्यांना पुन्हा काँग्रेसकडे वळविण्याकरिता ‘काँग्रेस कनेक्ट’ हे अभियान राबविण्यात येणार असून त्याचा प्रारंभ पुण्यामध्ये होत आहे. या उपक्रमांतर्गत युवा पिढीला, सुशिक्षित मध्यमवर्गीयांना काँग्रेसने देश उभारणीत दिलेल्या कार्याची माहिती देणे, त्यांच्या मनात पेरण्यात आलेले काँग्रेसविषयीचे गैरसमज दूर करणे, त्यांच्याशी सतत संपर्कात राहून काँग्रेसविषयी अधिकाधिक माहिती देणे, आदी अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांकरिता चित्रकला स्पर्धा, १२५ वर्षे झालेल्या गणेश मंडळांचा सन्मान, तसेच परिसंवाद, चर्चासत्रे आयोजित करण्यात आली असल्याचे मोहन जोशी यांनी सांगितले़ 

टॅग्स :congressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाणSonia Gandhiसोनिया गांधी