अपुऱ्या मतदान यंत्रांबाबत काँग्रेसची तक्रार
By Admin | Updated: February 14, 2017 02:23 IST2017-02-14T02:23:28+5:302017-02-14T02:23:28+5:30
महापालिका निवडणुकीमध्ये ४१ प्रभागांत १६२ जागांसाठी निवडणूक होत आहे़ प्रत्येक प्रभागामधील प्रत्येक गटाला एक मतदान यंत्र देण्यात यावे,

अपुऱ्या मतदान यंत्रांबाबत काँग्रेसची तक्रार
पुणे : महापालिका निवडणुकीमध्ये ४१ प्रभागांत १६२ जागांसाठी निवडणूक होत आहे़ प्रत्येक प्रभागामधील प्रत्येक गटाला एक मतदान यंत्र देण्यात यावे, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे़
महापालिका निवडणुकीत २ गटांसाठी एक मतदान यंत्र वापरण्याचा निर्णय झाला असल्याचे समजते़ यापूर्वीच्या महापालिका निवडणुकीमध्ये एका गटाला एक मतदान यंत्र उपलब्ध करून दिले जात होते.त्याच पद्धतीने येत्या निवडणुकीतही अ, ब, क आणि ड या प्रत्येक गटाला प्रत्येकी एक मतदान यंत्र उपलब्ध करून द्यावे़
निवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन याची तपासणी करून घेणे गरजेचे आहे़ त्यासाठी आपण सर्व राजकीय पक्षांना बोलावून ईव्हीएम मशिन तपासून घेण्याची तारीख कळवावी, अशी विनंती काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी केली आहे़