कॉंग्रेसचे उमेदवार किरण पवार यांच्यावर हल्ला

By Admin | Updated: February 20, 2017 15:55 IST2017-02-20T15:39:45+5:302017-02-20T15:55:07+5:30

कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार किरण अर्जुन पवार (वय ३१ रा नेहरूनगर पिंपरी) यांच्यावर अज्ञात व्यक्तिने

Congress candidate Kiran Pawar attacked | कॉंग्रेसचे उमेदवार किरण पवार यांच्यावर हल्ला

कॉंग्रेसचे उमेदवार किरण पवार यांच्यावर हल्ला

>ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 20 - प्रभाग क्रमांक ९ ब मधील कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार किरण अर्जुन पवार (वय ३१ रा नेहरूनगर पिंपरी) यांच्यावर अज्ञात व्यक्तिने धार धार शस्त्राने हल्ला करुन जखमी केले. ही घटना नेहरूनगर येथील पोस्ट ऑफिस जवळ सोमवारी पहाटे ३:१५ वाजता घडली.पोलिसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
 
या प्रकरणी किरण पवार यांनी संत तुकारामनगर पोलीस चौकित फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक मधुसुदुन घुगे यांनी दिलेल्या माहिती नुसार प्रभाग क्रमांक ९ ब मधील कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार किरण पवार सोमवारी पहाटे ३:१५ च्या सुमारास आपल्या घरी जात असताना नेहरूनगर येथील पोस्ट ऑफिस जवळील चाळीमध्ये अंधाराचा फायदा उचलत एका २४ वर्षीय अज्ञात व्यक्तिने किरण पवार यांच्या हातावर शस्त्राने हल्ला करुन पळून गेला.पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Congress candidate Kiran Pawar attacked