शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

कसब्यात काँग्रेसने गड भेदला, चिंचवडमध्ये भाजपने राखला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 06:14 IST

भाजपच्या बालेकिल्ल्यात मविआचे धंगेकर विजयी; दुसरीकडे भाजपच्या जगताप यांना प्रचंड मताधिक्य पुण्यातील निकालांनी वेधले देशाचे लक्ष 

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मुसंडी मारत महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांचा ११,०४० मतांनी पराभव केला. 

तब्बल ३० वर्षे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसब्यामध्ये धंगेकर यांचा ऐतिहासिक विजय झाला. कमळ कोमेजले व भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा गुलाल उधळला, तर चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी ३६,१६८ मताधिक्य घेत विजय साकारला.  राष्ट्रवादीचे नाना काटे ९९,३४३ मतांसह दुसऱ्या स्थानी राहिले.

कसे मिळाले मविआला ‘टॉनिक’?n कसबामधील विजयाने महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांचे मनोधैर्य वाढले आहे. महापालिकेत पाच वर्षे एकहाती सत्ता आणि खासदार, पाच आमदार, असा मोठा फौजफाटा असतानाही बालेकिल्ल्यात काँग्रेसने मुसंडी मारल्यामुळे भाजपला चिंतन करावे लागणार आहे. या निवडणुकीत भाजपने ४० स्टार प्रचारक उतरवले होते. n मुख्यमंत्री शिंदे हे दोन दिवस पुण्यात ठाण मांडून होते. उपमुख्यमंत्री फडणवीस हे दहावेळा पुण्यात आले होते. त्याचा फायदा कमी आणि तोटा जास्त झाला. धंगेकर यांची लोकप्रियताही महत्त्वाची ठरली. n कसब्यातील गणेशोत्सव मंडळे आणि स्थानिक संस्था-संघटनांशी धंगेकरांचा उत्तम ‘कनेक्ट’ आहे. शिवसेनेचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाकडे गेले. त्यामुळे ठाकरे गटांच्या शिवसैनिकांनी या निवडणुकीत नेटाने काम केले.

तीस वर्षांनंतर इतिहास घडला १९९१ ची पोटनिवडणूक वगळता या कसबा मतदारसंघावर भाजपचेच  प्राबल्य राहिले. इथे गिरीश बापट पाचवेळा आमदार होते. त्यानंतर मुक्ता टिळक या आमदार झाल्या होत्या. १९९१ च्या निवडणुकीत काँग्रेसचे वसंत थाेरात यांनी बापट यांचा पराभव केला होता. तीस वर्षांनंतर येथे इतिहास घडला आहे.

का पुन्हा फुलले चिंचवडमध्ये कमळ?n चिंचवडमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी होऊन राहुल कलाटे अपक्ष लढले. त्यांना मिळालेल्या मतांहून कमी फरकाने राष्ट्रवादीचे नाना काटे यांचा पराभव झाला. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे या मतदारसंघात सलग तीनदा निवडून आले होते. त्यामुळे त्यांचा प्रभाव कायम होता. n ते अजित पवारांच्या जवळचे असूनही २०१४ च्या निवडणुकीवेळी ते भाजपत गेले. पुढे फडणवीस यांचे खास झाले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचा उमेदवार उभा करण्याला अजित पवार यांनी प्राधान्य दिले; परंतु त्यांना बंडखोरी रोखता न आल्याने तिरंगी लढत झाली. बंडखोर कलाटे यांच्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाने कारवाई केली नाही. n त्यामुळे त्यांना ठाकरे गटाचा छुपा पाठिंबा असल्याची अफवा पसरली. ठाकरे गटाशी युती करणारे वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही कलाटे यांना जाहीर पाठिंबा देऊन सभा घेतली. त्याचाही फटका मविआला बसला

टॅग्स :kasba-peth-acकसबा पेठBJPभाजपाcongressकाँग्रेस