तळेगाव ढमढेरे येथे पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:13 IST2021-06-09T04:13:40+5:302021-06-09T04:13:40+5:30

या वेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष वैभव यादव, तालुका युवक अध्यक्ष संकेत गवारे, उमेश काळे, अमजद पठाण, प्रियंका बंडगर, अरुणा ...

Congress agitation against petrol-diesel price hike at Talegaon Dhamdhere | तळेगाव ढमढेरे येथे पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

तळेगाव ढमढेरे येथे पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

या वेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष वैभव यादव, तालुका युवक अध्यक्ष संकेत गवारे, उमेश काळे, अमजद पठाण, प्रियंका बंडगर, अरुणा मोहोळ, शीतल आनंदे, सचिन पंडित, संतोष शिंदे,सानिका बाळसराफ, अशोक तकटे, राकेश जाधव आदी उपस्थित होते.

महेश ढमढेरे म्हणाले की, पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दराचा भडका उडाला आहे. पेट्रोलने १०० रुपये लिटरचा टप्पा पार केला असून डिझेल ९२ रुपये लिटर झाले आहे. ही भाववाढ अशीच चालू राहिली, तर डिझेल १०० रुपये लिटर होण्यास फार दिवस लागणार नाहीत. स्वयंपाकाचा गॅसही ९०० रुपये झाला आहे. या महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त आहे, त्यात महागाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. जनतेला महागाईच्या खाईत लोटणाऱ्या केंद्र सरकारचा आम्ही सर्व ग्रामस्थ निषेध करत आहोत अशा तीव्र भावनाही ढमढेरे यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या.

०७ तळेगाव ढमढेरे

तळेगाव ढमढेरे येथे पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात आंदोलन करताना युवा कार्यकर्ते व ग्रामस्थ.

Web Title: Congress agitation against petrol-diesel price hike at Talegaon Dhamdhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.