सातव्या वेतन आयोग लागू झाल्याबद्दल राज्य शासनाचे अभिनंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:16 IST2021-09-17T04:16:06+5:302021-09-17T04:16:06+5:30

मुरलीधर मोहोळ, महापौर ------------------------ राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत अधिकारी-कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींची बुधवारी मंत्रालयात बैठक ...

Congratulations to the State Government on the implementation of the Seventh Pay Commission | सातव्या वेतन आयोग लागू झाल्याबद्दल राज्य शासनाचे अभिनंदन

सातव्या वेतन आयोग लागू झाल्याबद्दल राज्य शासनाचे अभिनंदन

मुरलीधर मोहोळ, महापौर

------------------------

राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत अधिकारी-कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींची बुधवारी मंत्रालयात बैठक झाली होती. तेव्हा महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनास पुढील आठवडाभरात राज्य सरकारची मान्यता मिळेल, असा शब्द त्यांनी दिला होता. परंतु, शब्द दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी अजित पवार यांनी हा प्रश्न मार्गी लावला असून, महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच राज्य सरकारची मंजुरी दिली आहे़ त्याबद्दल पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अजित पवार यांचे आम्ही आभार मानतो़

प्रशांत जगताप, शहराध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पुणे़

---------------

पालिकेतील कर्मचारी आणि अधिकारी यांना सातवा वेतन लागू झाला, ही अतिशय महत्त्वाची आणि समाधानाची बाब आहे. सभागृह नेता म्हणून आपण पालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मांडून एकमताने मंजूर केला, याचा विशेष आनंद आहे.

गणेश बिडकर, सभागृह नेता.

---------------------------

Web Title: Congratulations to the State Government on the implementation of the Seventh Pay Commission