मनसेच्या वर्धापनदिनाला सामसूम !

By Admin | Updated: March 10, 2015 04:56 IST2015-03-10T04:56:34+5:302015-03-10T04:56:34+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) नवव्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम शहर कार्यालयात सोमवारी झाला. मात्र, मनसेचे अनेक नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी

Congratulations to MNS! | मनसेच्या वर्धापनदिनाला सामसूम !

मनसेच्या वर्धापनदिनाला सामसूम !

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) नवव्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम शहर कार्यालयात सोमवारी झाला. मात्र, मनसेचे अनेक नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरविली होती. पक्षांतर्गत गटबाजीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून, त्याचे सावट वर्धापन दिनाच्या कार्यक्रमावर दिसून आले.
मनसेच्या स्थापनेला सहा वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच राज ठाकरे यांच्या करिष्म्यामुळे महापालिकेत फेब्रुवारी २०१२ च्या निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश मिळाले. महापालिकेत पाच वर्षांपूर्वी अवघे आठ नगरसेवक निवडून आले होते. मात्र, पुणेकरांनी तब्बल २९ नगरसेवक निवडून दिले. त्यामुळे मनसेला विरोधी पक्षनेतेपद मिळाले होते. शहर संघटन व विद्यार्थी संघटनेसाठी एकाऐवजी दोन अध्यक्ष नियुक्त केल्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये दोन गट पडले आहेत. पक्षांतर्गत गटबाजीमुळे संघटना बांधणीला फटका बसला आहे.
मंगळवार पेठ व हडपसर येथील प्रभागाच्या पोटनिवडणुकीत मनसेला दोन जागा गमवाव्या लागल्या आहेत. पक्षामध्ये नगरसेवकांपेक्षा नगरसेविकांची संख्या अधिक आहे. तरीही महापालिकेच्या स्थायीसह विविध महत्त्वाच्या समिती व पदावर महिलांना संधी मिळालेली नाही. मनसेला शहरात कणखर व आक्रमक नेतृत्व नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह आहे. त्यामुळे मनसेचा ९ वा वर्धापनदिन असूनही शहरात पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्त्यांनी आपल्या भागात कार्यक्रम घेतल्याचे दिसून आले नाही. मुंबईवरून एकही नेता पुण्यात आला नाही. तसेच, पुण्यातूनही पदाधिकारी मुंबईतील वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला गेले नसल्याचे सांगण्यात आले. केवळ डेक्कन येथील शहर कार्यालयात शहराध्यक्ष बाळा शेडगे, प्रकाश ढोरे, गटनेते बाबू वागसकर यांच्यासह मोजकेच लोक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Congratulations to MNS!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.