शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसने पुणे महापालिकेच्या पायऱ्या केल्या चक्क गोमुत्राने स्वच्छ; किरीट सोमय्यांचा झाला होता सत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 19:27 IST

काँग्रेसच्या वतीने पायऱ्यांवर गोमूत्र टाकून त्या पुन्हा पवित्र आणि स्वच्छ करण्यात आल्या

पुणे : पुणे महापालिकेत आज भाजप नेते किरीट सोमय्या यांच भाजपने जंगी स्वागत केलं. त्यावेळी मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी काही वेळ पोलीस व भाजप कार्यकर्त्यांमध्ये महापालिका आवरात येताना राडा झाला. पुणे महापालिकेत भाजपकडून पुणे महापालिकेत शक्तीप्रदर्शन अन् घोषणाबाजी करण्यात आली. शिवसैनिकांनी गेल्या शनिवारी पुणे महापालिकेत किरीट सोमय्या यांच्यावर केला होता हल्ला त्यामध्ये ते जखमी झाले होते. किरीट सोमय्या यांच्यावर ज्या शिवसैनिकांनी ठिकाणी हल्ला केला त्याच ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी सोमय्या यांचा सत्कार केला. त्यानंतर काँग्रेसने नवी शक्कल लढवत पुणे महापालिकेच्या पायऱ्या चक्क गोमुत्राने स्वच्छ केल्या आहेत. 

''पुणे महानगरपालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे. पण शहरातील रस्ता,पाणी अशा समस्यांकडे त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जात आहे. भाजप फक्त आता स्वतःची प्रसिद्धी मिळवण्याकडे लक्षकेंद्रित करू लागले आहेत. आज किरीट सोमय्या यांचे त्यांनी या पायऱ्यांवर जंगी स्वागत केले. भाजपचे नेते आणि कार्यकर्ते या पायऱ्यांवर उभे राहिले होते. पुणेकरांना वेठीस धरून त्यांनी याठिकाणी किरीट सोमय्यांचा सत्कार केला. त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो.  त्यामुळे आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीने पायऱ्यांवर गोमूत्र टाकून त्या पुन्हा स्वच्छ करत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.'' 

     कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत केले होते सोमय्यांचे स्वागत  किरीट सोमय्यांचा विजय असो, किरीट भाईंचा विजय असो, अशा जयघोषात पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर भाजपच्या वतीने किरीट सोमय्याचे जंगी स्वागत करण्यात आले. पुणे पोलिसांची परवानगी नसतानाही भाजपच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घातली. त्यामुळे प्रवेशद्वारावरून पोलिसाना हटण्यास भाग पाडले. महापालिका परिसरात अत्यंत गर्दी झाली होती. भाजपच्या कार्यकर्त्यांबरोबरच असंख्य नागरिकही उपस्थित होते. भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे चित्र यावेळी दिसून आले. गेटवर मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला होता. त्यावेळी पोलिसांना कार्यकर्त्यांना आवरता आले नाही. सर्व कार्यकर्ते पायऱ्यांवर बसून आहेत. आता पुष्पगुछ देऊन त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे.

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याcongressकाँग्रेसBJPभाजपाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका