शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा गोंधळ कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 02:56 IST

राज्य शासनाने संभ्रम दूर करण्याची मागणी

पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष १ नोव्हेंबर पासून सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु, राज्य शासनाने विद्यापीठ व महाविद्यालयांना कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे २०२०-२१ शैक्षणिक वर्ष केव्हा सुरू होणार, याबाबत संभ्रम कायम आहे.यूजीसीने शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत दोन वेळा मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या. त्यानुसार राज्य शासनाने व विद्यापीठाने आॅगस्ट-सप्टेंबरपासून संलग्न महाविद्यालयांना आॅनलाइन वर्ग सुरु करण्याबाबत कळविले. मात्र, यूजीसीने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकामध्ये १ नोव्हेंबरपासून शैक्षणिक वर्ष सुरू करावे, असे स्पष्ट केले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना आॅनलाइन पद्धतीने मार्गदर्शन केले जात आहे. मात्र, महाविद्यालयात प्रवेश घेतलेले सर्व विद्यार्थी आॅनलाइन वर्गांना उपस्थिती लावत नाहीत. त्यातच आॅनलाइन शिक्षण गृहीत धरले जाणार किंवा नाही; याबाबत संभ्रम आहे.यूजीसीने शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत परिपत्रक काढले असले तरी; राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने व विद्यापीठांनी याबाबत महाविद्यालयांना योग्य मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे. परंतु, याबाबत कोणत्याही सूचना दिल्या गेल्या नाहीत.आॅनलाइन शिक्षण गृहीत धरले जाणार आहे किंवा नाही. तसेच प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष केव्हापासून सुरू केले जाणार याबाबतचा संभ्रम राज्य शासनाने दूर करणे गरजेचे आहे.- प्रा. नंदकुमार निकम, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEducationशिक्षण