शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

लोणावळा ते महाबळेश्वर प्रवास केलेल्या नागरिकांच्या नावात तफावत असल्याने गोंधळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 11:09 PM

कपूर व वाधवान या दोन्ही कुटुंबांच्या यादीत सामाहिक असलेले जसप्रित सिंग, इंद्रलोक चौधरी, प्रदिप कांबळे, रमेश शर्मा व तारक सरकार यांच्याच नावाची नोंद लोणावळा नगरपरिषदेत असून त्यांची माहिती आयडीएसपी (IDSP) या संकेतस्थळावर भरण्यात आली आहे.

लोणावळा : देशभरात लाॅकडाऊन असताना लोणावळा ते महाबळेश्वर असा रेड कार्पेट प्रवास केलेल्या नागरिकांच्या लोणावळा व महाबळेश्वर येथील नावांमध्ये तफावत असल्याचा अहवाल लोणावळा मुख्याधिकारी यांनी म‍ावळ तहसीलदारांना दिला आहे. राज्याचे गृहविभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी ज्या पाच वाहनांना व 24 जणांना लोणावळा ते महाबळेश्वर प्रवास करण्याकरिता सवलत दिली होती. त्यापैकी केवळ पाच नावे काॅमन आहेत. इतर नावांमध्ये मात्र फरक आहे.कोरोना आजाराचा प्रादुर्भाव व संसर्ग यादरम्यान लोणावळा नगरपरिषद मुंबई व पुणे येथून आलेल्या नागरिकांच्या नावाची यादी देताना ती कपूर आडनावाने  देण्यात आला असून स्वतःच्या खर्‍या नावाचा उल्लेख केला नसल्याचे दिसून येत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.  पिकाॅक सोसायटी लोणावळा येथे मुंबईहून रहिवासाला आलेल्या एका व्यक्तीने सर्वांच्या नावाचा उल्लेख 25 मार्च रोजी स्वहस्ताक्षरात नोंदविला आहे. लोणावळा ते महाबळेश्वर असा प्रवास केलेल्या व्यक्ती ह्या वाधवान कुटुंबातील सदस्य कर्मचारी आहेत.या नावापैकी केवळ पाच नावे लोणावळ्यात सामायिक असून इतरांमध्ये वाधवान नव्हे तर कपूर नावे समोर आली आहेत. कपूर परिवारातील 9 व इतर 11 अशी 20 लोक लोणावळ्यातील गोल्ड व्हॅली भागातील एका खासगी बंगल्यात 25 मार्च पासून वास्तव्यात होती. लोणावळ्यातील भुरट नावाच्या एका कमिशन एजंटने 20 मार्च रोजी ऑनलाइन पद्धतीने एका खासगी बंगल्यात सदरची बुकिंग घेतली असल्याचे नगरपरिषदेला लेखी कळविले आहे. 22 मार्च रोजी लाॅकडाऊन झालेले असताना 25 मार्च रोजी ही मंडळी मुंबईतून लोणावळ्यात दाखल कशी झाली. वाधवान कुटुंबातील कोणीही सदस्यांनी लोणावळा खंडाळ्यात वास्तव केल्याची नोंद नाही. दुसरे म्हणजे गृहसचिवांनी परवानगी दिलेल्या वाधवान कुटुंबातील काही सदस्यांची नावे लोणावळ्यात कपूर कुटुंबांसोबत दिसत आहे.  हे कपूर कुटुंब देखील महाबळेश्वरला गेले असल्याचे चौकशीत समोर आले आहे. कपूर व वाधवान या दोन्ही कुटुंबांच्या यादीत सामाहिक असलेले जसप्रित सिंग, इंद्रलोक चौधरी, प्रदिप कांबळे, रमेश शर्मा व तारक सरकार यांच्याच नावाची नोंद लोणावळा नगरपरिषदेत असून त्यांची माहिती आयडीएसपी (IDSP) या संकेतस्थळावर भरण्यात आली आहे.इतर नावांमध्ये बहुतांश कपूर आडनावे नोंदविण्यात आली आहेत. त्यासर्वांनी लोणावळा येथून जिल्हाधिकारी यांची पुर्व परवानगी घेऊन महाबळेश्वर येथे जाणे अपेक्षित असताना नगरपरिषदेला अवगत न करता अथवा वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त परवानगी पत्र नगरपरिषदेकडे जमा करून जाणे अपेक्षित असताना तसे काहीही न करता नगरपरिषदेला पुर्व सुचना न देता लोणावळा नगरपरिषद हद्द सोडली असल्याचा अहवाल लोणावळा मुख्याधिकारी सचिन पवार यांनी मावळचे तहसिलदार तथा मावळ तालुका आपत्कालीन व्यवस्थापन समिती अध्यक्ष मधुसूदन बर्गे यांना पाठविला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस