पुणे महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान झालेल्या गोंधळाप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राम बोरकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक २९, ३० आणि ३२ यांची मतमोजणी पुण्यातील दीनदयाल शाळेत पार पडली. याच ठिकाणी मतमोजणीवेळी राम बोरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गोंधळ घातला होता.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मतमोजणी सुरू असताना राम बोरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना धमकावले, तसेच मतमोजणी प्रक्रियेत अडथळा निर्माण केला. या घटनेनंतर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
बोरकर यांच्या विरोधातील प्रकरण काय?
राम बोरकर हे प्रभाग क्रमांक २९ मधून मनसेचे उमेदवार होते. १६ तारखेला झालेल्या मतमोजणीदरम्यान त्यांनी निकालाबाबत आक्षेप नोंदवत अधिकाऱ्यांशी वाद घातला होता. या प्रकारामुळे मतमोजणी केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणणे, गैरकायद्याची मंडळी जमवणे तसेच मुंबई पोलीस कायद्याचा भंग केल्याच्या आरोपाखाली राम बोरकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Summary : MNS candidate Ram Borkar is booked for allegedly disrupting Pune Municipal Corporation election vote counting. He and his supporters reportedly threatened officials and obstructed the process at the Deendayal School, leading to police action for obstruction of duty and unlawful assembly.
Web Summary : पुणे महानगरपालिका चुनाव की मतगणना में बाधा डालने के आरोप में मनसे उम्मीदवार राम बोरकर पर मामला दर्ज हुआ। उन्होंने और उनके समर्थकों ने कथित तौर पर अधिकारियों को धमकी दी और दीनदयाल स्कूल में प्रक्रिया को बाधित किया, जिसके कारण कर्तव्य में बाधा और गैरकानूनी सभा के लिए पुलिस कार्रवाई हुई।