भाजपाच्या एबी फॉर्मवरून गोंधळ

By Admin | Updated: February 8, 2017 03:17 IST2017-02-08T03:17:41+5:302017-02-08T03:17:41+5:30

चऱ्होली-मोशी प्रभाग क्रमांक तीन ‘क’ मधील सर्वसाधारण महिला जागेसाठी भाजपाकडून दोन महिलांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत

The confusion with BJP's AB formula | भाजपाच्या एबी फॉर्मवरून गोंधळ

भाजपाच्या एबी फॉर्मवरून गोंधळ

पिंपरी : चऱ्होली-मोशी प्रभाग क्रमांक तीन ‘क’ मधील सर्वसाधारण महिला जागेसाठी भाजपाकडून दोन महिलांना एबी फॉर्म देण्यात
आले आहेत. शिवाय हे दोन्ही फॉर्म छाननी मध्ये वैध ठरविण्यात आले आहेत. भाजपाच्या महिला शहराध्यक्षा शैला मोळक व आमदार महेश लांडगे समर्थक साधना तापकीर या दोन्ही उमेदवारांना एबी फॉर्म मिळाले असल्याने नक्की अधिकृत भाजपाचा उमेदवार कोण हि उत्सुकता चऱ्होर्ली, मोशी सह भोसरी परिसरातील नागरिकांना लागली आहे. राजकीय कुरघोडी व शह काटशहाचे राजकारण सुरु
असल्याचे चित्र सुरु झाले असून
जुने निष्ठावन्त विरुद्ध नवीन भाजपावासी झालेले असे
राजकारण याठिकाणी पाहायला मिळत आहे. उद्या चिन्ह वाटप
होणार आहे.
भाजपाच्या दोन एबी फार्मबाबत निवडणूक निर्णय अधिकारी स्रेहल बर्गे यांना विचारले असता
याबाबत बुधवारी होणाऱ्या चिन्हवाटपाच्या वेळी निर्णय होईल, असे बर्गे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)

Web Title: The confusion with BJP's AB formula

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.