शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायतींमध्ये ‘थेट सरपंच’ निवडणुकीबाबत संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 18:44 IST

राज्य शासनाने थेट लोकांमधून सरपंचपदाची निवडणूक केली रद्द

ठळक मुद्देउमेदवारी अर्ज दाखल करण्यास उद्यापासून सुरुवात मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

पुणे : जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मुर्टी, मोराळवाडी, खराडेवाडी, पुरंदर तालुक्यातील आस्करवाडी, भिवरी आणि दौंड तालुक्यातील बिरोबावाडी या सहा ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली असून, शुक्रवार (दि. ६) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे. परंतु राज्य शासनाने थेट लोकांमधून सरपंचपदाचीनिवडणूक रद्द केली असून, अद्याप राज्यातील सरपंचपदांचे आरक्षणदेखील जाहीर झालेले नाही. यामुळे या सहा ग्रामपंचायतींमध्ये थेट लोकांमधून की सदस्य मंडळांमधून सरपंच निवडणूक होणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.     राज्य निवडणूक आयोगाने एप्रिल २०२० ते जून २०२० या कालवधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या सर्व ग्रामपंचायतींच्या १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२५ या कालवधीसाठी सरपंचपदाचे आरक्षण अद्याप निश्चित केलेले नाही. सरपंचपदासाठीचे आरक्षण अद्याप जाहीर झाले नसल्यामुळे थेट सरपंच निवडीसाठी नामनिर्देशन कोणत्या प्रवर्गासाठी मागवावे हे स्पष्ट होत नाही. यामुळे सरपंचपदाचे निवडणुकीची नोटीस जाहीर करणे योग्य नाही. यामुळे शासनाने आराक्षण जाहीर केल्यानंतर नोटीस प्रसिद्धी व नामानिर्देशन स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु करता येईल, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.     पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मुर्टी, मोराळवाडी, खराडेवाडी, पुरंदर तालुक्यातील आस्करवाडी, भिवरी आणि दौंड तालुक्यातील बिरोबावाडी या सहा ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी शुक्रवार (दि. ६) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे. १३ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतर १६ मार्च रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेर मुदत, त्यानंतर शिल्लक उमेदवारी अर्जांची छाननी करुन १८ मार्च रोजी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. यासाठी सहा ग्रामपंचायतींसाठी २९ मार्च रोजी मतदान होणार असून, ३० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यास सरपंच थेट लोकांमधून निवडणार की शासनाच्या नवीन अध्यादेशाची वाट पाहून नव्या पद्धतीनुसार सदस्यांमधून सरपंच निवडणार, याबाबत कोणतेही स्पष्ट आदेश नाहीत. यामुळे या सहा ग्रामपंचायतींमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. 

टॅग्स :PuneपुणेsarpanchसरपंचState Governmentराज्य सरकारgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक