गोंधळी प्रवाशांची पोलिसांना मारहाण
By Admin | Updated: November 12, 2016 22:43 IST2016-11-12T22:43:34+5:302016-11-12T22:43:34+5:30
प्रवाशांना लोकअदालतीमध्ये दंड सुनावण्यात आल्यानंतर या प्रवाशांच्या गटाने रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यालयाची तोडफोड केली.

गोंधळी प्रवाशांची पोलिसांना मारहाण
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १२ - रेल्वे स्थानकावरील नियमभंग करणा-या प्रवाशांना लोकअदालतीमध्ये दंड सुनावण्यात आल्यानंतर या प्रवाशांच्या गटाने रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यालयाची तोडफोड करीत कर्मचा-याला बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी दुपारी पुणे रेल्वे स्थानकावर घडली. या घटनेत सबंधित पोलीस कर्मचा-याच्या हाताला व डोक्याला जबर मार लागला आहे.
लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि लोहमार्ग पोलिसांनी (जीआरपी) पुणे रेल्वे स्थानकावर एकत्रित कारवाई केली. शनिवारी लोकअदालत असल्याने आरपीएफने 225 प्रवासी तर जीआरपीने 50 अशा एकूण 225 केसेस केल्या. या खटल्यांमधील आरोपींना लोकअदालतीसमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने यातील काही जणांना दंड सुनावला.
त्यामधील नाराज झालेल्या प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर गोंधळ माजवत आरपीएफचे पहिल्या मजल्यावरील कार्यालय फोडले. तेथे बसलेल्या एका पोलीस कर्मचा-याला बेदम मारहाण केली. दरम्यान, प्रवाशांनी पोलिसांनी जबरदस्तीने आपल्यावर कारवाई केल्याचा तसेच आरपीएफने जबरदस्तीने बॅगांची तपासणी करुन पैसे काढून घेतल्याचा आरोप केला.