पुणे भाजपातील वाद प्रदेश पातळीवर
By Admin | Updated: January 12, 2016 04:04 IST2016-01-12T04:04:12+5:302016-01-12T04:04:12+5:30
पक्षातील संघटनात्मक निवडीवरून भारतीय जनता पक्षामध्ये पालकमंत्री गिरीश बापट आणि खासदार अनिल शिरोळे यांच्या वादात आणखी एक ठिणगी पडली आहे.
पुणे भाजपातील वाद प्रदेश पातळीवर
पुणे : पक्षातील संघटनात्मक निवडीवरून भारतीय जनता पक्षामध्ये पालकमंत्री गिरीश बापट आणि खासदार अनिल शिरोळे यांच्या वादात आणखी एक ठिणगी पडली आहे.
महापालिकेच्या निवडणुका समोर ठेवून पक्षाकडून बापटसमर्थक असलेले महेश लडकत यांची सह निवडणूक प्रमुख म्हणून निवड करण्यास शिरोळे यांचा विरोध
कायम असून, लडकत यांची
नियुक्ती रद्द करावी, असे पत्रच खासदार शिरोळे यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व प्रदेश सरचिटणीस सुजितसिंग ठाकूर यांना पाठविले असल्याचे समजते. यावरून भाजपामधील अंतर्गत वाद आणखी वाढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
अवघ्या वर्षभरावर आलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या
बैठकीत सह निवडणूकप्रमुख
तसेच सहा सरचिटणिसांची
निवड करण्यात येणार होती.
या बैठकीत सह निवडणूकप्रमुख म्हणून महेश लडकत यांची वर्णी लावण्याची शिफारस बापट यांनी केली होती. त्याला शिरोळे यांनी विरोध केला.
लडकत यांची निवड आपल्याला तसेच इतर पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन करण्यात आली नसल्याचा आक्षेप खासदार शिरोळे यांनी
घेतला होता. त्यावरून बापट
आणि शिरोळे यांच्यात ठाकूर यांच्यासमोराच शाब्दिक खडाजंगी झाली होती. या वादाची चर्चा ताजी असतानाच, आता शिरोळे यांनी थेट लडकत यांची नियुक्ती करू नये. पक्षाकडून समितीत नेमण्यात येणाऱ्या इतर सहा सरचिटणीसपदांवरील कोणत्याही व्यक्तीची निवड लडकत यांच्या जागी करावी, अशी मागणी करणारे पत्रच वरिष्ठांना पाठविले आहे. त्यामुळे या दोन नेत्यांमधील वाद आणखी पेटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, या प्रकरणी शिरोळे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
(प्रतिनिधी)