शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंनी एक तरी ठोस विकासकाम दाखवावे; मुख्यमंत्री फडणवीस यांचे युतीच्या प्रचारसभेत आव्हान
2
आजचे राशीभविष्य १० जानेवारी २०२६ : धनु राशीला पदोन्नतीचे योग, तर तूळ राशीने राहावे सतर्क; वाचा काय सांगते तुमचे नशीब!
3
आमच्या अस्तित्वासाठी नव्हे, राज्यातील भावी पिढीच्या भवितव्यासाठी एकत्र आलो: ठाकरे बंधू
4
वडापाव-दाल पकवानचे महागठबंधन सत्तेवर येणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी-सिंधीवर भाष्य
5
विचारसरणी सोडून काँग्रेससोबत जाणाऱ्यांवर भाजपने कारवाई करावी: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
6
कुठे, कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक? मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेलमध्ये काय गाजतेय?
7
अजित पवारांची मिळाली साथ; अंबरनाथमध्ये शिंदेसेनेने भाजपचे ‘सत्तास्वप्न’ लावले उधळून
8
अमेरिका : मोदींनी फोन न केल्याने करार रखडला; भारत : मोदी-ट्रम्प यांच्यात ८ वेळा फोनवर संवाद
9
यंदा अर्थसंकल्प रविवारी मांडणार? अधिवेशन सुरू होणार २८ जानेवारीपासून; १३ फेब्रुवारीला संपेल
10
ईडीविरोधात तृणमूल संतप्त, खासदारांची दिल्लीत निदर्शने; ८ खासदार पोलिसांच्या घेतले ताब्यात
11
आम्ही जाणार नाही! चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी उमेदवारांच्या प्रचाराकडे फिरवली पाठ
12
सत्ताधाऱ्यांचे ‘विकासा’चे तर विरोधकांचे ‘बदल हवा’; ठाण्यात ठाकरे बंधू, भाजप-शिंदेसेनेचे बॅनर
13
राज्यात आचारसंहिता भंगाच्या १८६ तक्रारी, ८ कोटी जप्त केले; ३८ गुन्हे नोंदविण्यात आले
14
तीन वर्षांत किती बांगलादेशींना पकडून मायदेशी परत पाठवले? काँग्रेसचा सवाल; भाजपचा दावा फसवा
15
कारमध्ये १६ लाखांची रोकड; आचारसंहिता पथकाची कारवाई, पैसे कोठून आले? नवी मुंबईत कारवाई
16
अमेरिकेविरोधात महायुद्धाची तयारी? दक्षिण आफ्रिकेत चीन-रशिया-इराणच्या खतरनाक युद्धनौका पोहचल्या
17
Uddhav Thackeray: "तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा अन्..."; MIM सोबत युती अन् हिंदुत्वावरून भाजपावर घणाघात
18
WPL 2026 : Nadine De Klerk ची अविश्वसनीय खेळी! MI च्या तोंडचा घास हिरावून घेत RCB ला जिंकून दिली मॅच
19
Raj Thackeray: उमेदवारी मागे घ्यायला 'त्या' तिघांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंनी डागली सत्ताधाऱ्यांवर तोफ
20
Virat Kohli Viral Photo: चक्क बच्चे कंपनीसोबत किंग कोहलीला भेटायला आला 'चिकू' अन्...
Daily Top 2Weekly Top 5

बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यास विरोध, ठेकेदारधार्जिणा निर्णय रद्द करा, महापौर, आयुक्तांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 03:49 IST

पुण्याचे आभूषण आणि रंगभूमीचा आधार असलेले बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यास पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाने विरोध दर्शविला आहे. हे रंगमंदिर पाडू नये, याबाबतचे निवेदन मंगळवारी महापौर, महापालिका आयुक्तांना देण्यात आले.

पुणे - पुण्याचे आभूषण आणि रंगभूमीचा आधार असलेले बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यास पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाने विरोध दर्शविला आहे. हे रंगमंदिर पाडू नये, याबाबतचे निवेदन मंगळवारी महापौर, महापालिका आयुक्तांना देण्यात आले.या वेळी बाबासाहेब पाटील (पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाचे शहराध्यक्ष, मेलडी मेकर्सचे अशोककुमार सराफ, अभिनेत्री माधवी मोरे, आरती शिंदे, काव्या शिंदे, ज्योती बोरावके, कल्याणी वाडेकर, अभिनेता योगेश सुपेकर, आशुतोष वाडेकर, विनोद धोकटेकर, संदीप पळीवाले, नितीन मोरे, दीपराज जाधव, एकपात्री कलाकार परिषदेचे अध्यक्ष राहुल भालेराव, निर्माते माणिकशेठ बजाज, दिग्दर्शक चंद्र्रकांत दुधगावकर, राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे पदाधिकारी, सिने-नाट्य क्षेत्रातील कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते.बालगंधर्व रंगमंदिराची वास्तू पाडणे, हा पुणेकरांच्या कररूपी पैशाची उधळपट्टी करणारा आणि ठेकेदारधार्जिणा निर्णय आहे. बालगंधर्व रंगमंदिर हे पुण्याच्या नव्हे, तर राज्याच्या रंगभूमी चळवळीचे स्मृतिमंदिर आहे.शहरात प्रत्येक भागात रंगमंदिरे उभी राहिलेली आहेत, आता बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास करण्यापेक्षा त्याचे जतन करणे गरजेचे आहे. या रंगमंदिराच्या वास्तुतून दिग्गज कलाकार तयार झाले आहेत. या वास्तूचे जतन करणे आपले कर्तव्य आहे. ही वस्तू पडण्याचा घाट घातला जात आहे, ही दुर्दैवी बाब आहे, असे निवेदनात म्हटले आहे. बालगंधर्व रंगमंदिरात होणारे प्रयोग, सांस्कृतिक कार्यक्रम न थांबविता आणि त्यात खंड न पाडता त्या पद्धतीचे नियोजन करून बांधकाम करावे. बालगंधर्व रंगमंदिरातील मोकळी जागाआहे तिचा नवीन थिएटरउभारताना वापर करावा, असे मेलडी मेकर्सचे अशोककुमार सराफ यांनी सांगितले.पालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांच्यासमवेत महापौर मुक्ता टिळक, आयुक्त कुणालकुमार, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे पदाधिकारी मुरलीधर मोहोळ, श्रीनाथ भिमाले यांना निवेदन सादर केले.जीएसटीमुळे कलाकारांचे जीवनमान अडचणीतपु. ल. देशपांडे यांनी स्वत: उभे राहून बालगंधर्व रंगमंदिराचे काम पाहिले होते. पुलंच्या कल्पनेतून साकारलेले हे रंगमंदिर पडल्यास तत्कालीन कलाकारांच्या भावनांचा अपमान होईल. जीएसटी करप्रणाली आपल्यापासून सामान्य कलाकारांचे जीवनमान अडचणीत आहे. वाटते हे रंगमंदिर पाडून नव्याने बांधणे यासाठी तीन ते चार वर्षांचा कालावधी जाणार असून, अनेक नाटकांचे व्यावसायिक प्रयोग बंद होऊन कलाकारांवर मोठ्या प्रमाणावर उपासमारीची वेळ येऊ शकते. सद्य:स्थितीत असलेले बालगंधर्व रंगमंदिर उत्तम व सुस्थितीत असून, त्यामध्ये कामे करणे आवश्यक आहे, याकडे बाबासाहेब पाटील यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Puneपुणे