संमेलन पंजाबात, ग्रंथप्रदर्शन महाराष्ट्रात

By Admin | Updated: July 9, 2014 23:55 IST2014-07-09T23:55:47+5:302014-07-09T23:55:47+5:30

मराठी प्रकाशकांनी या संमेलनावर बहिष्कार टाकत राज्यात स्वतंत्र गं्रथ प्रदर्शन भरविण्याचा निर्णय घेतला आहे.

Conference in Punjab, in the bookproduction of Maharashtra | संमेलन पंजाबात, ग्रंथप्रदर्शन महाराष्ट्रात

संमेलन पंजाबात, ग्रंथप्रदर्शन महाराष्ट्रात

पुणो : महाराष्ट्रापासून खूप दूर पंजाबात होणा:या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मराठी वाचक अगदीच कमी येण्याची भीती असल्याने, मराठी प्रकाशकांनी या संमेलनावर बहिष्कार टाकत राज्यात स्वतंत्र गं्रथ प्रदर्शन भरविण्याचा निर्णय घेतला आहे.
दर्जेदार आणि विविधरंगी पुस्तकांची विक्री व्हावी आणि त्याची वाचकांना मेजवानी मिळावी, हाच हेतू गं्रथ प्रदर्शनाचा असतो. मात्र, तो पंजाबमधील संमेलनात साध्य होणार नसल्याचे कारण मराठी प्रकाशक परिषदेने दिले आहे.
संत नामदेवांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पंजाबमधील घुमान गावी यंदाचे 88वे साहित्य संमेलन आयोजित करण्यात येत आहे. परंतु तेथे मराठी भाषकांची संख्या अत्यल्पच असल्याने संमेलनाला किती मराठी साहित्यप्रेमी येतील, याविषयी शंका उपस्थित केली जात आहे. अशा परिस्थितीत मराठी पुस्तकांची विक्री होणो कितपत शक्य आहे. याविषयी प्रश्नचिन्हच आहे. म्हणूनच प्रकाशकांनी या संमेलनस्थळाविषयी नाराजी व्यक्त करून तेथे न जाण्याचा निर्णय घेतला आहे. संमेलनाला प्रकाशक जाणार नसल्याने तेथे गं्रथ प्रदर्शनही भरविले जाणार नाही. मात्र, त्याची भरपाई करण्यासाठी संमेलनात भरवण्यात येणा:या ग्रंथ प्रदर्शनासारखेच प्रदर्शन राज्यात 4 ते 5 ठिकाणी आयोजित करण्यात येणार असल्याचे मराठी प्रकाशक परिषदेचे राज्याचे कार्याध्यक्ष अरुण जाखडे यांनी सांगितले. 
जाखडे म्हणाले, ‘‘संमेलन स्थळ निवडण्याचा अधिकार मराठी साहित्य महामंडळालाच आहे. परंतु, यंदाच्या संमेलनस्थळी आमच्या पुस्तकांची विक्री होणो दुरापास्त आहे. तसेच, भौगोलिक अंतर एवढे जास्त आहे, की तेथे जाऊन स्टॉल लावणो आम्हाला परवडणारे नाही. त्यामुळे आम्ही तेथे जाणार नाही. यंदाच्या संमेलनाविषयी प्रकाशक निरुत्साही आहेत. त्याचा आम्हाला जो व्यावसायिक फटका बसणार आहे त्याची भरपाई म्हणून आम्ही राज्यात ग्रंथ प्रदर्शन आयोजित करणार आहोत. एरवीही ग्रंथ प्रदर्शने होतातच, परंतु संमेलनाच्या निमित्ताने यंदा एखादे प्रदर्शन जास्त होईल.’’  (प्रतिनिधी)
 
संमेलनाला समांतर निर्णय नाही
4हा निर्णय संमेलनाला समांतर नाही. त्यामुळे संमेलन काळातच प्रदर्शन आयोजित केले जाईलच असे नाही, असे स्पष्ट करत बैठक घेऊन प्रदर्शनाचे ठिकाण व तारखा निश्चित करणार असल्याचेही जाखडे यांनी सांगितले. 

 

Web Title: Conference in Punjab, in the bookproduction of Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.