औषधाविना रुग्णांचे हाल
By Admin | Updated: June 27, 2014 22:48 IST2014-06-27T22:48:36+5:302014-06-27T22:48:36+5:30
अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) केवळ 3क्क् औषध विक्रेत्यांवर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ केमिस्ट असोसिएशनने शुक्रवारी कडकडीत बंद पाळला.

औषधाविना रुग्णांचे हाल
>पुणो : अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) केवळ 3क्क् औषध विक्रेत्यांवर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ केमिस्ट असोसिएशनने शुक्रवारी कडकडीत बंद पाळला. त्यामुळे औषधाविना रुग्णांचे हाल झाले. औषधे मिळविण्यासाठी रुग्णाच्या नातेवाइकांची वणवण
सुरू होती. तसेच, रुग्णालयातील औषध दुकानांत रांगा लावून
अनेकांनी औषधेखरेदी केली.
मात्र, मागणी जास्त असल्याने
काही रुग्णालयांमधील औषध दुकानांतील औषधसाठा संपल्याच्या घटना घडल्या.
औषधविक्रेत्यांच्या बंदच्या पाश्र्वभूमीवर शहरातील 31 व पिंपरी-चिंचवडमधील 17 रुग्णालयांतील औषध दुकाने 24 तास सुरू ठेवण्यात आली आहेत. मात्र, शहरातील तब्बल 7 हजार 3क्क् दुकानदार बंदमध्ये सहभागी झाले आहेत. तसेच,
अनुचित घटना घडून नुकसान होऊ
नये, यासाठी साखळी औषध
दुकाने असलेल्या काही कंपन्यांनीदेखील दुकाने बंदच ठेवली
होती. परिणामी, शहरातील रुग्णांची मदार ही रुग्णालयातील औषध दुकानांवरच होती.
त्यामुळे शुक्रवारी सकाळपासूनच रुग्णाच्या नातेवाइकांनी विविध रुग्णालयांतील औषध दुकानांवर गर्दी केली होती. गर्दीमुळे औषधांचा
साठा संपण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे दुपारनंतर लहान मुलांसाठीची औषधे, जीवनावश्यक औषधे, कॅन्सर, मधुमेह, हृदयरोग अशी विविध प्रकारची औषधे मिळविण्यासाठी विविध रुग्णालयांची वारी करण्याची वेळ अनेकांवर आली.
रुग्णांना औषध मिळण्यास अडचण निर्माण होऊ नये, यासाठी एफडीएने विभागनिहाय अधिका:यांची नेमणूक केली आहे. रुग्णांना औषध न
मिळाल्यास त्यांनी एफडीएच्या क्2क्-2443क्113 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत माहिती देताना एस. टी. पाटील म्हणाले, ‘‘आरोग्य अधिका:यांना पत्र पाठवून औषधांचा अतिरिक्त साठा ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, शहरातील रुग्णालयांतूनदेखील औषधांची विक्री सुरूच राहणार आहे.’’ (प्रतिनिधी)