पक्ष सोडणारांची अवस्था बिकट

By Admin | Updated: February 14, 2017 01:36 IST2017-02-14T01:36:52+5:302017-02-14T01:36:52+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करणारा पक्ष आहे. पक्ष सोडलेल्यांची अवस्था ‘ना घरका ना घाटका’ अशी झाली आहे, असे प्रतिपादन पांडुरंग पवार

The condition of leaving the party is difficult | पक्ष सोडणारांची अवस्था बिकट

पक्ष सोडणारांची अवस्था बिकट

बेल्हा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करणारा पक्ष आहे. पक्ष सोडलेल्यांची अवस्था ‘ना घरका ना घाटका’ अशी झाली आहे, असे प्रतिपादन पांडुरंग पवार यांनी केले.
बेल्हा (ता.जुन्नर) येथे आठवडे बाजाराचे औचित्य साधून बेल्हा पंचायत समिती गणाचे उमेदवार अनघा घोडके, राजुरी पंचायत समिती गणाच्या उमेदवार सारिका औटी यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. पवार म्हणाले, ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून या मतदारसंघात अनेक कामे झाली आहेत. शासनाने या भागात अद्याप एकही ठोस काम केले नाही. फक्त बुद्धिभेद करत आहे. शेतकरीवर्गासाठी एकही चांगला निर्णय घेतला नाही.
माजी पंचायत समिती सभापती दीपक आवटे म्हणाले, जुन्नर तालुक्याला लालदिव्याची गाडी मिळणार आहे. त्यामुळे तालुक्याचे नंदनवन होणार आहे. या वेळी दूध संघाचे संचालक बाळासाहेब खिल्लारी, धोंडिभाऊ पिंगट, बाबाजी शिंदे, निवृत्ती घोडके, अतुल भांबेरे, राजुरी पंचायत समिती गणाच्या उमेदवार सारिका औटी, बेल्हा पंचायत समिती गणाच्या उमेदवार अनघा घोडके, विठ्ठल गुंजाळ, पांडुरंग साळवे यांची भाषणे झाली.
या वेळी पंचायत समिती सदस्या वर्षा पिंगट, दत्ता लामखडे,
दीपक आहेर, जयसिंग औटी,
रियाज बेपारी, प्रदीप पिंगट,
भानुदास खराडे, सुरेश तिकोणे, एम.डी. घंगाळे, गोविंद औटी, बाळासाहेब हाडवळे, किशोर आहेर आदी मान्यवर उपस्थित होते.(वार्ताहर)

Web Title: The condition of leaving the party is difficult

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.