निसर्गोपचार आश्रमात योगा सोहळ्याची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:08 IST2021-06-22T04:08:38+5:302021-06-22T04:08:38+5:30

२१ मे ते २१ जून या कालावधीत आश्रम व्यवस्थापन पथक डॉ. एन. जी. हेगडे (कार्यकारी विश्वस्त), डॉ. अभिषेक देविकर ...

Concluding Yoga Ceremony at Naturopathy Ashram | निसर्गोपचार आश्रमात योगा सोहळ्याची सांगता

निसर्गोपचार आश्रमात योगा सोहळ्याची सांगता

२१ मे ते २१ जून या कालावधीत आश्रम व्यवस्थापन पथक डॉ. एन. जी. हेगडे (कार्यकारी विश्वस्त), डॉ. अभिषेक देविकर (वैद्यकीय संचालक), डॉ. अमेया देविकर (CMO), प्रवीण कुंभार (व्यवस्थापक) यांनी समाजासाठी मोफत योग सत्रासारख्या विविध उपक्रमांची योजना आखली आहे. शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व इतर संस्थांना स्वतःची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सकाळी ७ वा. व दु. ४.३० वा. मोफत योग सत्र व स्वस्थ आरोग्यासाठी दररोज सकाळी १० वा. एक विशिष्ट व्याधीनुसार योग सत्र असे एक महिन्याच्या कालावधीचा मोफत योग सत्रात सहभागी व्हावे यासाठी आवाहन केले आहे. आश्रमातील योग तज्ज्ञ भगवती मुखेडकर, जालिंदर वाडेकर, सतीश सोनावणे, तुषार जगदाळे, विजय गाडेकर यांनी आश्रमाच्या फेसबुक माध्यामाव्दारे योग जनतेपर्यंत पोहचविला आहे.

जालिंदर वाडेकर, विजय गाडेकर यांनी योगक्रियांचे प्रात्यक्षिक केले. तुषार जगदाळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. निसर्गोपचार आश्रमचे व्यवस्थापक प्रवीण कुंभार यांनी आभार मानले.

Web Title: Concluding Yoga Ceremony at Naturopathy Ashram