शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

मुक्त ही संकल्पना राजकारणात चालते, संघात नाही- डॉ. मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2018 13:12 IST

मुक्त ही संकल्पना राजकारणात चालते, संघात नाही. आम्हाला राष्ट्रबांधणीसाठी विरोधकांसह सर्व समाज संघटित करायचा आहे.

पुणे : मुक्त ही संकल्पना राजकारणात चालते, संघात नाही. आम्हाला राष्ट्रबांधणीसाठी विरोधकांसह सर्व समाज संघटित करायचा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदुत्व या संकल्पनेचा काही लोकांकडून किस पडला जातो. मात्र, हिंदुत्व म्हणजे स्वतःबरोबरच कुटुंब, देश, जग, मानवता आणि सृष्टीवर असलेली श्रद्धा हे समजून घ्यायला हवे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे  प्रसिद्ध लेखक व भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी लिहिलेल्या तसेच अनुवादित केलेल्या माती, पंख नि आकाश, पासपोर्ट मॅन आॅफ इंडिया, शांती की अफवांए, होतच नाही सकाळ,  ज्ञानेश्वर मुळे की कविताएः प्रातिनिधिक संकलन या पुस्तकांचे प्रकाशन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय धोरणविश्लेषक, विचारवंत डॉ. संदीप वासलेकर उपस्थित होते रविवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे हा कार्यक्रम पार पडला.भागवत म्हणाले, 'ज्याचे विचार आपल्याला पटत नाहीत, जो आपला विरोधक आहे, त्यांना बरोबर घेऊन राष्ट्रबांधणीच्या ध्येयकडे वाटचाल करणे, युरोपियन लोकांना जमले. भारताला ते अद्याप जमलेले नाही. मागील चुका दुरुस्त करून एकमेकांना साथ देत, परंपरेचे भान बाळगत सकारात्मक वाटचाल राष्ट्रनिर्माणासाठी अत्यंत गरजेची आहे.' 'ज्याला सर्वसामान्यांच्या भाषेत बोलता येत नाही तो प्रशासन कसे चालावणार. नोकरशाहीला नकारशाहीकडून होकारशाहीकडे न्यायचे असेल तर मातीशी नाळ जुळलेला प्रशासक हवा, असेही त्यांनी नमूद केले.

टॅग्स :Puneपुणे