पुणे : मुंढवा येथील पासपोर्ट कार्यालयाच्या इमारतीवील सातव्या मजल्यावरुन उडी मारुन तरुणीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी घडली.अश्विनी गवारे (वय २२, रा़ विठ्ठलवाडी, शिरुर, सध्या धर्मानगर, चंदननगर, खराडी) असे या तरुणीचे नाव आहे़ याबाबत मुंढवा पोलिसांनी सांगितले, की अश्विनी ही ग्लोबल टॅलेंट सर्च या खासगी कंपनीमध्ये गेल्या ४ महिन्यांपासून टेलि काऊन्सेलिंगचे प्रशिक्षण घेत होती़ गेल्या चार दिवसांपासून ती ट्रेनिंगला आली नव्हती़ सोमवारी सकाळी ट्रेनिंगसाठी आल्यानंतर ती इमारतीच्या सातव्या मजल्यावर गेली़ तेथील बाल्कनीच्या कठड्यावरुन तिने उडी मारली़ त्यात ती गंभीर जखमी झाली होती़ तिला जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले़ परंतु, उपचारापूर्वीच तिचा मृत्यु झाला होता़ या घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अमित वाळके व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट दिली़अश्विनी गवारे हिच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकले नाही़ मुंढवा पोलीस अधिक तपास करीत आहेत़
पासपोर्ट कार्यालयाच्या इमारतीवरुन उडी मारुन संगणक अभियंता तरुणीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 14:49 IST
मुंढवा येथील पासपोर्ट कार्यालयाच्या इमारतीवील सातव्या मजल्यावरुन उडी मारुन तरुणीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी घडली.
पासपोर्ट कार्यालयाच्या इमारतीवरुन उडी मारुन संगणक अभियंता तरुणीची आत्महत्या
ठळक मुद्देअश्विनी ही ग्लोबल टॅलेंट सर्च या खासगी कंपनीमध्ये घेत होती टेलि काऊन्सेलिंगचे प्रशिक्षणअद्याप समजू शकले नाही़ अश्विनी गवारे हिच्या आत्महत्येमागील कारण