विद्यापीठातील तिघांना सक्तीची सेवानिवृत्ती

By Admin | Updated: June 19, 2014 23:39 IST2014-06-19T23:39:18+5:302014-06-19T23:39:18+5:30

गुणवाढ प्रकरणी विभागीय चौकशीमध्ये दोषी अढळलेल्या तीन कर्मचा:यांवर विद्यापीठ प्रशासनातर्फे कारवाई करण्यात आली

Compulsory retirement of three university teachers | विद्यापीठातील तिघांना सक्तीची सेवानिवृत्ती

विद्यापीठातील तिघांना सक्तीची सेवानिवृत्ती

>पुणो : पुणो विद्यापीठातील परीक्षा विभाग काम करीत असताना विद्याथ्र्याच्या पुनर्मूल्यांकनामध्ये बेकायदेशीरपणो गुणवाढ प्रकरणी विभागीय चौकशीमध्ये दोषी अढळलेल्या तीन कर्मचा:यांवर विद्यापीठ प्रशासनातर्फे कारवाई करण्यात आली असून, त्यांना सक्तीने सेवानिवृत्त करण्यात आले. तसेच, उर्वरित चार कर्मचारी निदरेष असल्याचा अहवाल विभागीय चौकशी समितीने विद्यापीठाला सादर केला आहे. त्यानुसार या चार कर्मचा:यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेतले जाणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू यांनी दिली. 
या प्रकरणाची उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश जे. ए. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात होती. या समितीने चौकशी करून अहवाल सादर केला. या समितीचा अहवाल प्राप्त होताच, संबंधितांवर विद्यापीठातर्फे कारवाई करण्यात आली आहे.  
याबाबत कडू म्हणाले, ‘‘अशोक शंकर रानवडे, चेतन गजानन परभाणो आणि रमेश किसन शेलार या तीन लिपिकांना चौकशी समितीने दोषी ठरविले असून, त्यांना सक्तीची निवृत्ती दिली जाणार आहे. सहायक कुलसचिव राजेंद्र पंडित, उप कुलसचिव लालसिंग वसावे, सुरेंद्र नायडू आणि नंदा पवार यांची या बेकायदा गुणवाढीच्या आरोपातून सुटका झाली आहे. या चारही जणांना सेवेत रुजू करून घेतले जाणार आहे; परंतु त्यांना परीक्षा विभागात काम दिले जाणार नाही.’’ (प्रतिनिधी)
 
परीक्षा विभागाकडे विद्यार्थानी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केल्यानंतर त्यात बेकायदेशीपणो गुणवाढ केल्या प्रकारणी दीड वर्षापूर्वी सात कर्मचा:यांवर पोलिसांनी कारवाई केली होती. 

Web Title: Compulsory retirement of three university teachers