शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

‘समग्र प्रेमानंद गज्वी’ खंडात्मक ग्रंथाची निर्मिती, ९९व्या अ. भा. मराठी नाट्य संमेलनात होणार प्रकाशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 02:09 IST

कलेसाठी कला की जीवनासाठी कला या वादात अडकून न पडता ज्ञानासाठी कला याचे आत्मभान साहित्यविश्वाला देणारी ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांची ग्रंथसंपदा म्हणजे वाचकांसाठी संग्रही ठेवावा असा एक अमूल्य ठेवा.

- नम्रता फडणीसपुणे  - कलेसाठी कला की जीवनासाठी कला या वादात अडकून न पडता ज्ञानासाठी कला याचे आत्मभान साहित्यविश्वाला देणारी ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांची ग्रंथसंपदा म्हणजे वाचकांसाठी संग्रही ठेवावा असा एक अमूल्य ठेवा. मात्र गज्वी यांची ही साहित्यसंपदा सहजासहजी उपलब्ध होत नसल्यामुळे वाचकांना त्यापासून वंचित राहावे लागते. हीच गरज लक्षात घेऊन नागपूर येथील विजय प्रकाशनने नाट्य संमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्या नाटकांचा समावेश असलेल्या ‘समग्र प्रेमानंद गज्वी’ या पहिल्या खंडाची निर्मिती केली आहे.एखाद्या नाटककाराच्या साहित्यकृतींवर प्रथमच अशाप्रकारे समग्र खंड साकारला जात आहे. या खंडामध्ये गज्वीप्रेमींना त्यांची गाजलेली सात नाटके वाचायला मिळणार आहेत. येत्या २२ ते २५ फेब्रुवारीदरम्यान नागपूर येथे होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनामध्ये या पहिल्या खंडात्मक ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे.समाजातील देवदासींचा प्रश्न असो अथवा जातीय गुंत्यामधून निर्माण झालेली समाजव्यवस्था असो अशा सगळ्या प्रश्नांचा आपल्या टोकदार लेखणीतून वेध घेणाºया प्रेमानंद गज्वी यांच्या नाटकांनी वाचकांच्या मनाचा ठाव घेतलाआहे.त्यांची नाटके कालातीत असल्यामुळेच केवळ मराठी नव्हे तर हिंदी, कन्नड, तेलुगू, बंगाली, छत्तीसगढी, मल्याळी आदी भारतीय भाषांमध्ये त्यांची नाटके अनुवादित झाली असून, त्याचे प्रयोगही काही निवडक भाषांमध्ये झाले आहेत.तीन खंडांतून समोर आणणारमराठी साहित्यविश्वात स्वत:चा वेगळा ठसा उमटविणाºया या आधुनिक नाटककाराची ग्रंथसंपदा वाचकांना सहजासहजी उपलब्ध होत नाही. यासाठी विजय प्रकाशनाने प्रेमानंद गज्वी यांची ग्रंथसंपदा तीन खंडांच्या माध्यमातून वाचकांसमोर आणण्याचे ठरविले आहे.पहिला खंड नाटकांवर आधारित असून, यामध्ये गज्वी यांच्या ‘देवनवरी’, ‘किरवंत’, ‘तनमाजोरी’, ‘पांढरा बुधवार’, ’वांझ माती’, ‘जय जय समर्थ’ आणि ‘गांधी आंबेडकर’ या सात नाटकांचा समावेश असल्याची माहिती विजय प्रकाशनचे सचिन उपाध्याय यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.गज्वी हे नाटककार म्हणून ओळखले जात असले तरी त्यांनी कथा, कादंबºया आणि काव्यलेखनही केले आहे. त्यामुळे दुसरा खंड एकांकिका आणि तिसरा खंड कथा, कादंबºया यावर आधारित असणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Puneपुणे