रिक्षाचालकांचा संमिश्र प्रतिसाद
By Admin | Updated: June 17, 2015 23:45 IST2015-06-17T23:45:09+5:302015-06-17T23:45:09+5:30
शहरातील काही भाग वगळता रिक्षा बंदला संमिश्र प्रतिसाद लाभला. विविध मागण्यांसाठी रिक्षाचालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीतर्फे बुधवारी बंद पुकारला होता.

रिक्षाचालकांचा संमिश्र प्रतिसाद
पिंपरी : शहरातील काही भाग वगळता रिक्षा बंदला संमिश्र प्रतिसाद लाभला. विविध मागण्यांसाठी रिक्षाचालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीतर्फे बुधवारी बंद पुकारला होता.
शहरातील काही भाग वगळता सर्व ठिकाणी रिक्षा प्रवासी वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू आहे. पिंपरी, आकुर्डी, निगडी भागात रिक्षा बंदचा परिणाम जाणवला. रिक्षा न मिळाल्याने अनेकांना बसची वाट बघत ताटकळत उभे राहावे लागले. महिला आणि वृद्धांना बसथांब्यापर्यंत जाऊन बस पकडावी लागली. प्रवाशांची गर्दी वाढली होती.
बंद यशस्वी करण्यासाठी काही संघटनांचे प्रतिनिधी अरेरावी करीत असल्याचे दिसून आले. काही ठिकाणी प्रवाशांना रिक्षातून जबरदस्तीने उतरवण्यात आले. पिंपरी चौकात असे प्रकार झाल्याची तक्रार प्रवाशांनी केली. बंदमधून विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षांना वगळण्यात आले होते. शहरातील सर्वच भागांत दुपारनंतर रिक्षा वाहतूक सुरू झाल्याने बंदचा परिणाम जाणवला नाही. बंदमध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखालील रिक्षा पंचायत सहभागी नव्हती. आंबेडकर चौकात व आकुर्डी येथील चौकात काही रिक्षांवर दगडफेक करण्यात आली. आॅटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीतर्फे निदर्शने करण्यात आली.
महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे, अजित शेख, सुदाम बनसोडे, सोमनाथ कलाटे, सचिन म्हेत्रे, पप्पू शेख, मिलिंद कांबळे, गोकुळ रावळकर, दत्ता भोसले, इक्बाल शेख उपस्थित होते. (प्रतिनिधी)