शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

बालेकिल्ल्यातच ‘बंद’ ला संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 1:27 AM

इंधन दरवाढीच्या विरोधात सोमवारी (दि. १0) विरोधी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातच संमिश्र प्रतिसाद मिळाला.

बारामती : इंधन दरवाढीच्या विरोधात सोमवारी (दि. १0) विरोधी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातच संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवित निषेध व्यक्त केला. मात्र, अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश व्यापारी, सर्वसामान्य नागरिकांनी ‘भारत बंद’पासून दूर राहणेच पसंत केले. राष्ट्रवादीच्याच बालेकि ल्ल्यात बंदला मिळालेला संमिश्र प्रतिसाद चर्चेचा विषय ठरला. केवळ कसबा, मारवाड पेठ, दुकाने बंद ठेवून बंद पाळण्यात आला. सिनेमा रोडसह मुख्य बाजारपेठेत दुकाने दुकाने सुरुच होती.तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने इंधन दरवाढीचा जाहीर निषेध करण्यात आला. तहसीलदार हनुमंत पाटील यांना निवेदन देण्यात आले. या वेळी तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, पंचायत समिती सभापती संजय भोसले, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, अ‍ॅड. राजेंद्र काटे, राजेंद्र रायकर, उपसभापती शारदा खराडे, उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, संपत काटे, सुभाष सोमाणी, नगरसेवक समीर चव्हाण, अमर धुमाळ, राहुल भापकर, धनवान वदक, वनिता बनकर, अनिता गायकवाड, आरती शेंडगे, अनिल गायकवाड, राहुल वाबळे, राहुल कोकरे,सुनील बनसोडे, उपाध्यक्ष अनिल जाधव आदी उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेदेखील बंदमध्ये सहभाग घेतला. दर लक्षात घेता मोदींचे अच्छे दिन येण्याआधीचेच दर पूर्ववत व्हावे, असे मत मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. सुधीर पाटसकर यांनी व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. विनोद जावळे, अ‍ॅड. नीलेश वाबळे, मंगेश गिरमे, हसन शेख, बिलाल बागवान, अमोल गालिंदे, अ‍ॅड. भार्गव पाटसकर, प्रवीण धनराळे,हृषीकेश पवार, शुभम भंडारे, चंद्रकांंत भोसले उपस्थित होते. काँग्रेसच्या वतीने अ‍ॅड. आकाश मोरे आंदोलनात सहभाग घेतला.>अजित पवार यांच्या आवाहनानंतरदेखील संमिश्र प्रतिसाद...इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राज्य सरकारला जागे करण्यासाठी सोमवारी आयोजित भारत बंदमध्ये सगळ्या नागरिकांनी सहभागी व्हावे. राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात बंदमध्ये सहभागी होणार आहे, असे आवाहन बारामती येथे खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (दि. ९) पत्रकारांशी बोलताना केले होते. पवार येथील विविध संस्थांच्या सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित होते. मात्र, आजच्या बंदला मिळालेला प्रतिसाद पाहता राष्ट्रवादीसह विविध पक्षांच्या केवळ पदाधिकाºयांनी बंदमध्ये सहभाग घेऊन निषेध व्यक्त के ला. मात्र, सर्वसामान्य नागरिकांसह बहुतांश व्यावसायिक व्यापाºयांनी पवार यांच्या बंदच्या केलेल्या आवाहनाला संमिश्र प्रतिसाद दिल्याचे चित्र होते. बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने येथे १०० टक्के प्रतिसाद मिळणे अपेक्षत होते. मात्र, नेत्यांनी आवाहन करूनदेखील मिळालेला संमिश्र प्रतिसाद शहरात चर्चेचा विषय होता.>मनसे कार्यकर्त्यांची दगडफेक बसवर दगडफेकदौंड : भाजपा सरकारने केलेलल्या पेट्रोल, डिझेल वाढीच्या निषेर्धात काँग्रेसच्या वतीने पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. दरम्यान, मनसेच्या काही कार्यकरतयांनी दौंड-सिध्दटेक बसवर दगडफेक केल्याने एक विद्यार्थी किरकोळ जखमी झाला.याप्रकरणी मनसेच्या सचीन कुलथे, सागर पाटसकर, जमीर सय्यद, अझर कुरेशी या चार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचा काँग्रेसचा संबंध नसल्याचा निवार्ळा दौंड शहर काँग्रेसचे अध्यक्ष बाबा शेख यांनी दिला आहे. एसटी चालक शिवाजी होले यांनी फिर्याद दिली आहे.होले हे सकाळी सिध्दटेक येथून दौंडकडे येण्यासाठी निघाले होते. बसमध्ये विद्यार्थी आणि प्रवासी होते. दरम्यान, येथील संभाजी स्तंभा जवळ विद्यार्थी व प्रवासी उतरले. तर तीन विद्यार्थी आणि दोन प्रवासी बसमध्ये बसलेले होते. बस पुढे डेपोत जायला निघाली तेव्हा येथील शेठ ज्योती प्रसाद विद्यालयाच्या परिसरात मनसेचे पाच ते सात कार्यकर्ते आले. यावेळी होले यांच्या परिचयाच्या सचीन कुलथे याने त्याच्या हातातील दगड बसच्या काचेवर मारला. हा दगड बसमध्ये आत पडला. त्यानंतर त्याच्या हातात असलेल्या बांबूने दुसरी काच फोडली. या घटनेमुळे एक विद्यार्थी जख्मी झाला असून तो ११ वीच्या घटक चाचणीच्या शेवटच्या पेपरला निघाला होता. जखमी अवस्थेतही त्याने महाविद्यालयात जाऊन परिक्षा दिली.

टॅग्स :Bharat Bandhभारत बंद