शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

संगतकाराने स्वत:ला कलेच्या चौकटीत बसविणे गरजेचे : विजय घाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 14:55 IST

पं. उमेश मोघे यांनी पं.विजय घाटे यांच्याशी साधलेल्या मनमोकळ्या संवादाव्दारे रसिकांना एका उमद्या कलाकाराच्या जडणघडणीची सुरेल कथा ऐकायला मिळाली.

ठळक मुद्देअनेक दिग्गजांचा सहवास लाभला हे माझे भाग्य

पुणे  : तबलावादन हे एकल असते. पण मुख्यत: हे वाद्य साथसंगत करण्यासाठी वापरले जाते. गायन, नृत्य, बासरी, सतार, संतूर अशा कोणत्याही वाद्याबरोबर तबल्याची साथ देताना मुख्य कलाकाराच्या विचारांशी आपले वादन एकरुप झाले पाहिजे. त्या कलाकाराच्या गायन, नृत्य किंवा वादनावर हावी न होता त्याच्या साथीदाराचीच भूमिका पार पाडली पाहिजे. सगळ्या घराण्यांचा अभ्यास करून साथसंगत करत असताना वैविधघ्यपूर्ण घराण्यांच्या चौकटीत स्वत:ला आणि स्वत:च्या कलेला बसविणे गरजेचे असते. तरच आपण विविध घराण्यातील गायक, वादक आणि नर्तकांना उत्तम साथसंगत करू शकतो, अशा शब्दात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबलावादक पं. विजय घाटे यांनी मैफलीमधील‘संगतकारा’चे महत्व अधोरेखित केले. भारतीय विद्याभवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनतर्फे सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित ‘तालसंवाद’ या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी घाटे यांनी उपस्थितांसमोर साथसंगतीचे रहस्य उलगडले. दाबके ट्रस्ट,पुणे प्रस्तुत या कार्यक्रमाद्वारे प्रसिद्ध तबला वादक पद्मश्री पं.विजय घाटे यांच्या कारकिर्दीचा सांगीतिक मागोवा घेण्यात आला.  पं. उमेश मोघे यांनी घाटे यांच्याशी साधलेल्या मनमोकळ्या संवादाव्दारे रसिकांना एका उमद्या कलाकाराच्या जडणघडणीची सुरेल कथा ऐकायला मिळाली. यावेळी भारतीय विद्याभवनचे संचालक आणि मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे उपस्थित होते. तबलावादनाच्या निमित्ताने मला अनेक दिग्गजांचा सहवास लाभला हे माझे भाग्यच समजतो. या थोरा-मोठ्यांच्या संगतीत त्यांची संगीताची भाषा मला आत्मसात करता आली. ती भाषा माझ्यात झिरपत गेली आणि त्याविषयीच्या मनन-चिंतनातून मी माझे वादन समृद्ध करीत गेलो. संगीत क्षेत्रातील या दिग्गजांमुळे माझे वादन अधिक सकस होण्यास मोठा हातभार लागला. घाटे पुढे म्हणाले,मनोरंजन आणि अभ्यास म्हणून तबला वादन ऐकणे यात फरक आहे. अभ्यास म्हणून तबलावादनाची साधना करत असताना तुमच्या आवडत्या आणि आदर्श कलाकाराचे वादन खूप वेळा ऐकणे आणि अभ्यासू वृत्तीने ऐकणे गरजेचे असते.यावेळी  पं. विजय घाटे यांनी तबलावादनाच्या काही प्रात्यक्षिकांव्दारे दिलेल्या कलानुभूतीला रसिकांनी भरभरून दाद  दिली. त्यांना अभिषेक शिनकर यांनी हार्मोनियमवर  साथसंगत केली. 

टॅग्स :Puneपुणेmusicसंगीत