आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे : हंकारे

By Admin | Updated: February 13, 2017 01:24 IST2017-02-13T01:24:58+5:302017-02-13T01:24:58+5:30

‘निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे. गावाच्या शांततेला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी,

To comply strictly with the Code of Conduct: Hmmm | आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे : हंकारे

आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे : हंकारे

नीरा-नृसिंहपूर : ‘‘निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे. गावाच्या शांततेला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी,’’ असे आवाहन पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी केले.
नीरा नरसिंहपूर येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसंदर्भात शनिवारी (दि. ११) सायंकाळी आयोजित शांतता बैठकीत पोलीस निरीक्षक हंकारे यांनी मार्गदर्शन केले.
हंकारे म्हणाले, की निवडणुकीच्या काळात ग्रामस्थांनी आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे. गावाच्या शांततेला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. मतदानाच्या वेळी कोणी गैरप्रकार केल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. कोणाच्या दबावाला बळी न पडता लोकशाही पद्धतीने मतदान करा. दरम्यान, या वेळी हंकारे यांनी मतदान बूथची पाहणी केली. या वेळी अण्णा काळे, संतोष मोरे, विकास ताटे, बळीराम गलांडे, रंगुनाथ सरवदे, फंटू साळवे, शंकर सरवदे, शंकर राऊत यांच्यासह ग्रामस्थ व सर्व पक्षांचे कार्यकर्ते या शांतता बैठक ीसाठी उपस्थित होते.

Web Title: To comply strictly with the Code of Conduct: Hmmm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.